आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Decide To Go With Lalu Or Nitishkumar Paswan

लालू की नितीशकुमार ? कॉँग्रेसनेच निवड करावी,पासवान यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्ष पक्षाची आघाडी करताना बिहारमध्ये लालूंना जवळ करायचे की नितीशकुमार याचा निर्णय कॉँग्रेसनेच घ्यावयाचा आहे, असे मत लोकजनशक्ती पार्टीचे (एलजेपी) प्रमुख रामविलास पासवान यांनी व्यक्त केले आहे.


संयुक्त जनता दलाच्या (जदयू) नेत्यांशी संपर्क साधण्याची तयारी सुरू असल्याचे एलजेपीच्या सूत्रांनी सांगितले. जदयूने 17 वर्षे जुन्या रालोआ आघाडीसोबतचे संबंध संपुष्टात आणल्यानंतर कॉँग्रेस व एलजेपी या पक्षाला बरोबर घेण्याच्या प्रयत्नात आहेत. कॉँग्रेस व एलजेपीची आघाडी कायम आहे. आघाडीत जदयूला की राजदला घ्यावयाचे हे कॉँग्रेसनेच ठरवावे. आम्ही कॉँग्रेससोबत लढणार हे स्पष्ट असल्याचे पासवान म्हणाले.


बिहारमध्ये कॉँग्रेसने राजदला सोबत घेतल्यास कॉँग्रेस-राजद-एलजेपी आघाडी होईल. जदयूला सोबत घेतल्यास कॉँग्रेस-जदयू-एलजेपी आघाडी होईल. पासवान यांनी कॉँग्रेस आघाडीबाबत पहिल्यांदाच मत व्यक्त केले आहे. लालू आणि पासवान यांनी आघाडीच्या मुद्द्यावर सोनिया गांधी यांची नुकतीच भेट घेतली होती. मात्र, सोनिया यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.