आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेत चर्चा : डोकलाम वादावर युद्धाने नव्हे, चर्चेद्वारेच निघेल तोडगा- सुषमा स्वराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचे परराष्ट्र धोरण आणि सामरिक भागीदारांशोबत ताळमेळ या मुद्द्यंावर गुरुवारी राज्यसभेत चर्चा झाली. विरोधकांनी सरकारवर शेजारी देशांसोबतचे संबंध बिघडवल्याचा आरोप केला. ‘चीनसोबत चर्चेची दार अजूनही खुली आहेत की बंद होत आहेत?,’ असा प्रश्न काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी विचारला.
 
त्याला उत्तर देताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, डोकलाममध्ये चीनसोबत सुरू असलेल्या वादावर युद्ध हा तोडगा नाही, चर्चेद्वारेच तोडगा निघेल. चीनसोबतच्या वादावर भारताची भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, चीनशी द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. आता देश सामरिक नव्हे तर आर्थिक क्षमतेवर चालतो. त्यामुळे आर्थाक क्षमता वाढवायला हवी. आपल्या आर्थिक क्षमतेत चीनचे मोठे योगदान आहे. 
 
भारत धैर्य, संयमाने काम करत आहे. चर्चेदरम्यान विरोधकांनी शेजाऱ्यांशी संबंध चांगले करण्यावर भर देताना म्हटले की, शेजारी सुरक्षित असेल तरच देश मजबूत राहू शकतो. आनंद शर्मा म्हणाले की, आपण पाकिस्तानला वेगळे पाडण्याची भाषा का करतो? भारताचे परराष्ट्र धोरण मजबूत असून अमेरिका ,रशिया दोघेही भारतासोबत आहेत, असे सुषमा म्हणाल्या.
 
ट्रम्प यांना आव्हान देण्याचे मोदींमध्ये धाडस : सुषमा
सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली. त्या म्हणाल्या की, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी वैयक्तिक आदर कमावला होता, तर मोदी यांनी विदेशात भारताचा मान वाढवला आहे. येचुरी भारताला अमेरिकेचा कनिष्ठ भागीदार म्हणत आहेत. पण हे खरे नाही. कुठेही उभे राहून ट्रम्प यांना आव्हान देण्याचे धाडस मोदींंमध्ये आहे. ते ग्लोबल अजेंडा निश्चित करणारे पंतप्रधान झाले आहेत.
 
अानंद शर्मा यांच्या प्रश्नांवर सुषमांनी दिली उत्तरे... 
 
१. जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेविषयी मोदी मौन का ?
डोकलामविषयी चीनची भूमिका नाहक आक्रमक आहे. मोदींनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. भारताचे म्हणणे आहे की, उभय देशांत जर्मनीच्या हॅम्बर्गमध्ये सविस्तर चर्चा झाली. मात्र चीन याला नकार देत अाहे.तरीही मोदी गप्प का ?
 
२. नाट्यमयरीत्या मोदी पाकिस्तानला गेले.
पंतप्रधान ‘मन की बात’ करतात. मात्र सीमेवर घडणाऱ्या घटनांविषयी ते मौन आहेत. अफगाणिस्तान दौऱ्याला नाट्यमय कलाटणी देत अचानक पाकिस्तानला गेले. तिथे काय चर्चा झाली याविषयी का सांगितले नाही? अमेरिकेत गेल्यावर ते म्हणतात की, भारताची ताकद जगाने आेळखली आहे. मात्र पाकिस्तानने तर ती मान्य केलेली नाही.
 
३. मोदींना एकट्याने परदेशात जाण्याचा शौक आहे. मंत्र्यांना सोबत नेत नाहीत.
६५ देशांना मोदींनी भेटी दिल्या. मात्र संसदेला या दौऱ्यांच्या फलनिष्पत्तीविषयी सांगण्याची गरज त्यांना वाटत नाही. त्यांना एकट्याने परदेश वाऱ्या कराव्या वाटतात. अनिवार्य असेल तरच मंत्र्यांना सोबत नेले आहे.
 
१. राहुल यांनी चिनी राजदूताला आपल्या घरी का बोलावले होते?
मोदी यांनी जिनपिंग यांना म्हटले होते की, मतभेद असतात. मात्र वादंग माजवू नका. चीनच्या प्रश्नाविषयी सरकारकडे तथ्य मागण्याऐवजी राहुल गांधी यांनी चिनी राजदूताची भेट का घेतली, हा प्रश्न का विचारला जात नाही?
 
२. आपल्या संबंधांच्या हे विरोधात होते.
पंतप्रधान प्रोटोकॉल तोडून नवाझ शरीफ यांच्या वाढदिवस समारंभात सामील झाले. हे आपल्या संबंधाच्या विरुद्ध होते. बुरहान वानीच्या चकमकीतील मृत्यूनंतर नवाझ शरीफ यांनी त्याला शहीद संबोधले. तेव्हा परिस्थिती चिघळली. आपल्या सरकाच्या ध्येयधोरणांमध्ये  दहशतवादाचा खात्मा हा कळीचा मुद्दा आहे. त्यानंतरच पाकिस्तानशी मैत्री शक्य आहे.
 
३. काही लोकांना भांडण लावण्यात स्वारस्य आहे
काही लोकांना भांडणे लावण्यात प्रचंड स्वारस्य आहे. आनंद शर्मांचे उदाहरण घ्या. शरद यादवही चिथावतात. रामगोपाल यादव,सीताराम येचुरी याला पसरवतात. मनमोहन सिंगांनी सांगावे की , कितीदा सलमान खुर्शीद वा आनंद शर्मांना सोबत घेऊन गेले. बहुपक्षीय चर्चेसाठी मी मोदींसह जाते.
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...