आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Dissents Want Rahul Gandhi To Deliver Or Get Lost BJP Modi Priyanka

सोनियांना विरोध, राहुल यांना हटवण्याची मागणी? प्रियंका आल्या बचावासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हलचालींना वेग आला आहे तर, पराभवानंतर काँग्रसमध्ये खळबळ माजली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील संकट कमी होण्याचे नाव घेत नाही. काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री प्रफुल्ल पटले यांनी उघड टीका केल्यानंतर आता काँग्रेसमधील एक गटही राहुल गांधीविरोधात उभा राहाताना दिसत आहे. न्यूज वेबसाइट रिडीफच्या वृत्तानुसार या गटाचे म्हणणे आहे, की राहुल गांधी यांच्या धोरणामुळेच पक्षाची ही अवस्था झाली आहे. पक्षात सुधारणा करा अन्यथा राजीनामा द्या, इथपर्यंत या गटामध्ये राहुल गांधींविषयी रोष आहे. त्यांचे म्हणणे आहे, राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची परंपरा आणि पद्धती समजून घेतली पाहिजे.
पक्षाला बदल करावा लागेल
काँग्रेसमधुन जो रोष व्यक्त होत आहे, या स्थितीत राहुल गांधी पदावर कायम राहातील यात शंकाच आहे. मात्र, पक्षातील एकाही नेत्याने उघड राहुल गांधींविरोधात मोर्चा उघडलेला नाही, हे देखील विशेष. तसेच कोणी पर्याय देखील सांगितलेला नाही. त्यामुळे पक्षात काही बदल होणार असतील तर ते, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधी देखील निशाण्यावर
या गटाच्या निशाण्यावर सोनिया गांधी देखील आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की सोनिया गांधी पक्ष हितापेक्षा जास्त राहुल गांधींचा बचाव करत आहेत. भाजपच्या विजयाबद्दल त्यांचा निष्कर्ष आहे, की जनतेने यंदा काँग्रेस आणि घराणेशाही विरोधात मोदींच्या बाजूने मतदान केले.
प्रियंका गांधीनी सांभाळली आघाडी
राहुल गांधींवर टीका होत असतानाच प्रियंका गांधी यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात यावी ही देखील मागणी होत आहे. या दरम्यान त्यांना गाजावाजा न करता पक्षाचे काम सुरु केले असल्याची सुत्रांची माहिती आहे. प्रियंका गांधी - वढेरा या राहुल गांधींच्या बचावात समोर आल्या आहेत. तसेच, पक्षाच्या आगामी रणनीतीसाठी होणा-या बैठकीत त्या सहभागी होऊ लागल्या आहेत.
गांधी कुटुंबावरच प्रश्नचिन्ह ...वाचा पुढील स्लाईडवर