आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ लाखांचे बनावट धनादेश वाटून काँग्रेसचे "मोदी'(एप्रिल) फूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एप्रिल फूल अनोख्या पद्धतीने साजरा केला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना १५- १५ लाखांच्या बनावट चेकचे (धनादेश)वाटप केले. अशा प्रकारचे सुमारे ७ हजार चेक छापण्यात आले होते. त्यावर इंडियन इनोसन्ट पीपल्सचे नाव होते
व शाखा होती स्टेट बँक ऑफ मोदी. चेक क्रमांक होता ०००४२०११. चेक वाटप करताना माइकवर "एप्रिल फूल बनाया'चे गाणे वाजवले जात होते. मोदींच्या काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याच्या आश्वासनाची अशा प्रकारे खिल्ली उडवण्यात आली होती.
दिल्लीत साजरा झाला केजरीवाल दिन

दुसरीकडे राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर भगतसिंग क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर लावून एप्रिल फूल केजरीवाल दिवस म्हणून साजरा केला.