आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Does A U turn On Atal Bihari Vajpayee, News In Divya Marathi

अटलबिहारी वाजपेयी सर्वांत दुबळे पंतप्रधान : काँग्रेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संजय बारू आणि पी. सी. पारेख या कोळसा खात्यातील अधिकार्‍यांच्या पुस्तकांत डॉ. मनमोहनसिंग यांची प्रतिमा दुबळे पंतप्रधान अशी रंगवण्यात आल्यानंतर काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर देत थेट माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव घेऊन भाजपला लक्ष्य केले. वाजपेयीच देशाचे सर्वांत दुबळे पंतप्रधान होते, असे काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

वाजपेयींनी दहशतवाद्यांना त्यांच्या घरी कंदहारमध्ये सुरक्षित पोहोचवले. त्यांच्याच कार्यकाळात संसदेवर हल्ला झाला. गुजरात दंगलीनंतर ते मोदींना पदच्युत करू पाहत होते, परंतु नंतर पक्षाच्या दबावाखाली झुकले. कारगिल युद्धानंतर मुशर्रफ यांनी वाजपेयींच्याच काळात भारतात मुक्काम करत पाहुणचार घेतल्याचे झा यांनी म्हटले आहे.