आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Expels Vijay Bahuguna\'s Son For \'anti party\' Activities, Rawat Attacks BJP

उत्तराखंड : काँग्रेस-भाजपने राष्ट्रपतींसमोर मांडली एकमेकांची गाऱ्हाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ डेहराडून - उत्तराखंडमधील वाद आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापर्यंत पोहोचला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपापली बाजू राष्ट्रपतींसमोर मांडली. भाजपने रावत सरकार बरखास्त करण्याची मागणी केली, तर रावत सरकार अस्थिर करण्याची प्रयत्न भाजप करत आहे, अशी तक्रार काँग्रेसने केली.
दुसरीकडे, काँग्रेसने सोमवारी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे चिरंजीव साकेत आणि पक्षाचे संयुक्त सचिव अनिल गुप्ता अशा दोन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. रावत सरकारच्या विरोधात बंड करणाऱ्या आमदारांचे नेतृत्व केल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

रावत यांचा आरोप : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार उत्तराखंडसारख्या लहान राज्यातील सरकार अस्थिर करून लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री हरीश रावत यांनी पत्रकार परिषदेत केला. रावत म्हणाले की, भाजप धनशक्ती आणि दंडशक्तीचा वापर करत आहे. राज्यासाठी हा प्रकार योग्य ठरणार नाही. असे झाले तर राज्यात दरवर्षी नवीन मुख्यमंत्री होईल. त्यामुळे अस्थिरता निर्माण होऊन राज्याची स्वप्ने साकार होणार नाहीत.

काँग्रेस-भाजपची परस्परांच्या विरोधात तक्रार
केंद्र सरकारच्या विरोधात तक्रार करण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भटले. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात गुलाम नबी आझाद, मोतीलाल व्होरा, अंबिका सोनी, अहमद पटेल आणि कपिल सिब्बल यांचा समावेश होता.दुसरीकडे, भाजपचे राज्यातील सर्व खासदार तसेच ३५ आमदारांनी विजय चौक ते राष्ट्रपती भवन असा मार्च काढला. पक्षाचे नेते कैलाश विजयवर्गीय आणि श्याम जाजू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रावत सरकार बडतर्फ करावे, अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली. रावत सरकारने बहुमत गमावले आहे. ७० सदस्यांच्या विधानसभेत आपल्याला काँग्रेसच्या ९ बंडखोरांसह ३६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा पक्षाने राष्ट्रपतींसमोरही केला आहे. भाजपने विधानसभा अध्यक्षांच्या विराेधातही तक्रार केली.
विधानसभा अध्यक्ष सरकारचे एजंट : भाजप
विधानसभेचे अध्यक्ष गोविंद कुंजवाल हे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या एजंटप्रमाणे काम करत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ता मुन्नासिंह चौहान म्हणाले की, सरकारच्या बाजूने बहुमत नाही. त्यामुळे विनियोजन विधेयक नामंजूर होणार हे माहीत असल्यानेच कुंजवाल यांनी त्यावर मतदान होऊ दिले नाही. त्यावरून ते सरकारच्या एजंटप्रमाणे काम करत असल्याचे स्पष्ट होते. सरकारची बाजू घेऊन अध्यक्षांनी घटनेचे उल्लंघन केले आहे.
मुख्‍यमंत्री रावत यांनी आमदारांना पाठवले नैनीतालला...
> बहुमत सिद्ध करण्यासाठी 28 मार्चपर्यंतची मुदत मिळताच उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत
> जेही आमदार मुख्‍यमंत्री हरीश रावत यांच्‍या गटाचे आहेत ते सर्व माजी मुख्‍यमंत्री विजय बहुगुणा यांचे समर्थक असल्‍याचे सांगितले जात आहे.
> जुलैमध्‍ये राज्‍यसभेची जागा रिक्‍त होत असून, या ठिकाणी आपली वर्णी लागावी, अशी बहुगुणा यांची इच्‍छा असल्‍याचे सांगितले जात आहे.
> दरम्‍यान, बंडखोरीमुळे अडचणीत असलेले मुख्‍यमंत्री रावत यांनी आणखी आफत नको, या उद्देशाने कॉंग्रेस आणि पीडीएफच्‍या आमदारांना तीन खासगी हेलिकॉप्‍टरने नैनीतालला पाठवले आहे.
> विधानसभेचे अध्यक्ष गोविंद सिंह कुंजवाल यांनी काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे.
> तुमचे सदस्यत्व संपुष्टात का आणू नये, अशी विचारणा नोटिशीत करण्यात आली असून उत्तर देण्यासाठी 26 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. ही नोटीस ई-मेल द्वारे पाठवली असून सर्व बंडखोर आमदारांच्या घराबाहेरही चिटकवण्यात आली आहे.
- सीएम हरीश रावत दिल्लीला पोहोचले असून, ते सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.
- रावत यांनी रविवारी म्‍हटले, ''मी पंतप्रधानांना विनंती करतो की, त्‍यांनी लोकशाहीचा गळा घोटून होळी खेळू नये''
बातम्या आणखी आहेत...