आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - केंद्रातील यूपीए सरकार अल्पमतात आहे की बहुमतात, यावर शुक्रवारी देशभर राजकारण तापले. याची सुरुवात गुरुवारी रात्री पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यापासून झाली. पंतप्रधान म्हणाले होते की, समाजवादी पार्टीने खुशाल पाठिंबा काढावा. संतापलेल्या मुलायम यांनी शुक्रवारी मीडियासमोर सरकारला भ्रष्ट आणि काँग्रेसला धोकेबाज संबोधले. मात्र, इतक्यात पाठिंबा काढणार नाही, असेही स्पष्ट केले. नोव्हेंबरपर्यंत सार्वत्रिक निवडणूक होईल, असे भाकीतही त्यांनी करून टाकले.
मुलायम यांच्या वक्तव्यावर सर्वांत प्रथम तृणमूलने प्रतिक्रिया दिली. मुकुल रॉय यांनी सरकार अल्पमतात आल्याचे सांगत राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर लगेच भाजपने पत्रकार परिषदेत केंद्र आणि मुलायम यांच्यावर टीका केली. पक्षप्रवक्ते रविशंकर प्रसाद म्हणाले, मुलायम एवढे अस्वस्थ असतील तर पाठिंबा काढून का घेत नाहीत?
यामुळे पाठिंबा कायम : पाठिंबा काढला तर सरकार पाडल्याचा ठपका येईल. शिवाय, याचा फायदा जातीयवादी शक्तींना होईल.
निवडणूक याच वर्षी : लोकसभेची निवडणूक याच वर्षी होऊन तिसरी आघाडी सत्तेत येईल, असे भाकीत मुलायम यांनी वर्तवले. आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार नाही, असेही ते म्हणाले.
अडवाणींची स्तुती : 23 मार्चला मुलायम यांनी अडवाणींची स्तुती केली होती. मात्र, तो उल्लेख राज्य सरकारला सावध करण्यासाठी केला होता, अशी कोलांटउडी त्यांनी घेतली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.