आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Game Plan To Target Aap Not Bjp In Delhi Election

भाजप नव्हे तर 'आप'ला निवडणुकीत लक्ष्य करणार काँग्रेस, जाणून घ्या रणनीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी नवी रणनीती आखली आहे. दिल्लीत काँग्रेस भाजपला नव्हे तर आम आदमी पार्टी (आप) ला लक्ष्य करणार आहे.

काँग्रेसने त्यांच्या पक्षाची स्थिती मजबूत करण्यापेक्षा 'आप'ला तिसरा पर्याय बनण्यापासून रोखणे हे मुख्य लक्ष्य ठरवले आहे. त्यामुळेच हायकमांडने निवडणूक प्रभारी आजय माकन यांना मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपऐवजी आपला अधिक लक्ष्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

फोटो - काँग्रेसने अजय माकन यांना विधानसभा निवडणुकीत चेहरा म्हणून समोर आणले आहे.


स्वतःची प्रतिमा बादलण्याचाही प्रयत्न
देशात सुमारे 60 वर्षे सत्ता उपभोगणा-या काँग्रेसने देशाच्या राजधानीत होणा-या निवडणुकांमध्ये अशा प्रकारे आपली रणनीती बदलण्यामागे अनेक कारणे आहेत. पक्षातील अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हायकमांडने अथ्यंत गहन विचार करून याबाबत अंतिम निर्णय घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळेच माकन एकापाठोपाठ आपवर टीका करत असून थेट भाजपचा विरोध करणे टाळत आहेत. सर्व समस्यांसाठी काँग्रेसच जबाबदार आहे हे लोकांच्या मनातून जावे यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा मागे टाकणे आणि आम आदमी पार्टीची विश्वसनीयता कमी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

आपचे राजकारण नव्या पद्धतीचे
यामागचे आणखी एक कारण म्हणजे आप ज्या मार्गाने मार्गक्रमण करत आहे, त्यावर यश मिळायला काही वेळ लागणार आहे. पण ते लोकांना आकर्षित करण्यात मात्र यशस्वी ठरत आहेत. भाजपशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसकडे मुद्दे आहेत. मात्र आपचे राजकारण पूर्णपणे वेगळे आहे. त्यामुळेच अशी रणनीती आखण्यात आली आहे. जनता भ्रष्टाचाराबरोबरच नेत्यांच्या व्हिआयपी संस्कृतीलाही कंटाळली आहे. त्यामुळे नवी दिल्लीत तिसरा पर्याय म्हणून आप समोर येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राष्ट्रीय राजकारणातही आपला पाय पसरायला वेळ लागणार नाही, हे काँग्रेसला माहिती आहे. आणखी एक अंतर्गत कारण म्हणजे दिल्लीत आपची सत्ता आल्यास काँग्रेसला भ्रष्टाचाराचा मुद्दा त्रासदायक ठरू शकतो.

राहुल गांधींना दूर राहण्याचा सल्ला
काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली निवडणुकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण आतापर्यंत मोदींच्या समोर प्रोजेक्ट करण्यात आलेल्या राहुल गांधींची केजरीवाल यांच्यासमोरही उंची कमी वाटू नये असे नेत्यांचे मत आहे. त्यामुळेच अजय माकन यांना पुढे करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, भाजपची निवडणुकांसाठीची तयारी