आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Get Only Two Front Row Seats In Lok Sabha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभेत राहुल गांधी मागच्याच बाकावर, काँग्रेसला नाही मिळाल्या मनासारख्या जागा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नव्या लोकसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सभागृहातील पक्षाचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनाच फक्त पुढच्या रांगेत बसता येणार आहे. येथे त्यांना आम आदमी पार्टी आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांसोबत बसावे लागणार आहे. सभागृहातील आसन व्यवस्थेत काँग्रेसने पहिल्या रांगेत चार जागांची मागणी केली होती, त्यांना फक्त दोन जागा देण्यात आल्या आहेत. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संख्याबळानुसार तुम्हाला फक्त दोनच जागा मिळतील असे स्पष्ट केले आहे.
पहिल्या रांगेत मुलायमसिंह आणि देवेगौडाही
लोकसभेतील आसन व्यवस्था ही पक्षांच्या संख्याबळावर अवलंबून असते. अध्यक्षा महाजन यांनी संख्याबळाचा विचार करुन आसन व्यवस्था निश्चित केली आहे. पहिल्या रांगेत जागा मिळणे हे खासदार आणि पक्षाच्या प्रतिष्ठेचे मानले जाते. सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायसमसिंह यादव यांना ज्येष्ठतेच्या आधारावर पहिल्या रांगेत जागा देण्यात आली आहे. वास्तविक त्यांच्या पक्षाचे चारच खासदार आहेत. तर, जनता दल (एस)चे नेते एच. डी. देवेगौडा यांचाही मान (माजी पंतप्रधान) राखण्यात आला आहे. त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले आहे.
330 सदस्य असलेल्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पहिल्या रांगेत 12 जागा देण्यात आल्या आहेत. त्यात पंतप्रधान मोदींसह त्यांचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मंत्री बसतील.
पाच पक्षांना नको होता काँग्रेसचा शेजार
सभागृहातील आसन व्यवस्था ठरविताना अध्यक्षा महाजन यांना मोठी कसरत करावी लागल्याची चर्चा आहे. कारण तृणमूल काँग्रेस, एआयएडीएमके, बीजेडी, टीआरएस आणि वायएसआर काँग्रेस यांनी काँग्रेस सदस्यांच्या शेजारी बसण्यास नकार दिला होता. लोकसभा अध्यक्षांना त्यांनी कळविले होते, की काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांशी आम्ही आंतर ठेवून आहोत. त्यामुळे त्यांच्यापासून आम्हाला वेगळी जागा देण्यात यावी.
काँग्रेसला 16 व्या लोकसभेत फक्त 44 जागा मिळाल्या आहेत. तर, जयललिता यांचा एआयएडीएमके 37 सदस्यांसेह तिसर्‍या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर 34 सदस्यांसह तृणमूल काँग्रेस आहे.
राहुल गांधींना पुढे बसता येणार नाही
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा पक्ष सत्तेत असताना ते कायम मागे बसत असल्यामुळे चर्चेत राहात होते. नव्या लोकसभेत अर्थसंकल्प सादर होत असताना त्यांच्या आई आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांना पुढे बोलावून घेतले होते. त्याआधी एक दिवस लोकसभेत डोळे मिटून बसलेला त्यांच्या व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर काँग्रेस नेत्यांनी ते डोळे मिटून शांतपणे चर्चा ऐकत असल्याचा बचाव केला होता. आता नव्या आसन व्यवस्थेत त्यांना सक्तीने मागच्या बाकावर बसण्याची वेळ आली आहे.