आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आप'मुळे कॉंग्रेस नेते धास्‍तावले, पदावरुन अंतर्गत मतभेद वाढले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आम आदमी पार्टीच्‍या सरकारवरुन कॉंग्रेसमध्‍ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. सरकारला पाठींबा देण्‍यावरुन कॉंग्रेसमध्‍ये अंतर्गत विरोध होता. परंतु, आता पदांसाठी आमदारांमध्‍ये भांडणे होऊ लागली आहेत. कॉंग्रेसचे 8 आमदार निवडून आले आहेत. त्‍यांच्‍यातच दोन गट बनले आहेत. गटनेता कोणाला बनवावे, यावरुन हा वाद निर्माण झाला आहे.

सुत्रांच्‍या माहितीनुसार, हारुन युसुफ यांना कॉंग्रेसचे गटनेते म्‍हणून निवडले जाऊ शकते. परंतु, त्‍यांच्‍या नावाला विरोध आहे. अरविंदरसिंग लवली यांच्‍याकडे दिल्‍ली प्रदेश कॉंग्रेसची सुत्रे आली आहेत. त्‍यामुळे सर्वकाही या दोघांना देण्‍यावरुन आमदारांमध्‍ये नाराजी आहे. वरिष्‍ठ कॉंग्रेस नेते मतीन अहमद यांना गटनेता बनविले पाहिजे, असे आमदारांचे मत आहे. परंतु, मतीन अहमद यांना पक्षश्रेष्‍ठींचा आदेश मानू, असे स्‍पष्‍ट केले.