नवी दिल्ली - ‘
आपण राजकीय अस्पृश्यता पाळत नाही’, असे सांगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी केवळ टि्वटवरून आदरांजली अर्पण करणाऱ्या पंतप्रधान
नरेंद्र मोदींना काँग्रेसने जशास तसे उत्तर दिले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी काँग्रेसने १९ देशांतील ५५ नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, मोदींना या संमेलनाचे निमंत्रणच देण्यात आलेले नाही.
नवी दिल्लीत १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी हे संमेलन होईल. मात्र, परदेश दौऱ्यावर असलेल्या ‘पर्यटक पंतप्रधानांना’ आम्ही निमंत्रित केलेले नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले. मोदींना का बोलावले नाही, या प्रश्नावर शर्मा म्हणाले की, आम्ही करत आहोत ते योग्यच आहे. हे काँग्रेसचे संमेलन असून काँग्रेसची विचारसणी मानणाऱ्यांनाच निमंत्रित देण्यात आले आहे.
यांचा सहभाग
हमीद करझाई (अफगाणिस्तान), जॉन कफूर (घाना), जनरल ओबासेंजो (नायजेरिया), माधव के. नेपाल (नेपाळ), अस्मा जहांगीर (पाकिस्तान), अहमद कथरदा (द. आफ्रिका), नबी शहा (फिलिपाइन्स)