आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Is Making Fun Of Modi's Made In India Slogan After Team India's Defeat

भारताच्या पराभवाच्या बहाण्याने काँग्रेस नेते उडवत आहेत, मोदींच्या घोषणेची खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीटरवर टीम इंडियाच्या पराभवाच्या बहाण्याने मोदींवर टीका केली.
नवी दिल्ली - टीम इंडियाला इंग्लंडने कसोटी मालिकेत 3-1 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. या पराभवाची री ओढत काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात उल्लेख केलेल्या मेड इन इंडियाच्या घोषणेची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. दिग्विजय सिंह, अभिषेक मनू सिंघवी आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी रविवारी रात्री भारताचा पराभव होताच, यासंदर्भात ट्वीट करण्यास सुरुवात केली.
या पराभवानंतर काँग्रेस नेते दिग्वीजय सिंह यांनी ट्वीट केले की, 'मला माझ्या मुलीने मॅसेज पाठवला, मोदींच्या भाषणाचे गांभीर्याने पालन करणारे सर्वात पहिले टीम इंडियाचे खेळाडू आहेत. आता त्यांच्या धावा मेड इन इंडियाच असतील.'

काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी ट्वीट केले की, '4 वर्षांत परदेशी धरतीवर भारताचे 13 पराभव झाले आहेत. आपण अखेरच्या वेळी कधी जिंकलो होतो. आपला संघ ख-या अर्थाने भारताचा राष्ट्रीय संघ आहे. कारण आपण केवळ भारतातच जिंकतो.'
दुस-या एका ट्वीटमध्ये सिंघवी यांनी पोस्ट केले की, 'भारतीय नागरिकांचे संघावरचे प्रेम जेवढे वाढले आहे, तेवढीच त्यांची कामगिरी खालावत चालली आहे. त्यांची जोरदार अपयशी कामगिरी सुरुच आहे.'

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी टीम इंडियाला भारतीय महिला टीमकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय महिला टीम पुरुषांच्या टीमला जिंकण्याच्या कलेसंदर्भात मार्गदर्शन करू शकते, असे प्रियंका यांनी ट्वीट केले आहे.

मोदींच्या घोषणा
निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी अच्छे दिन आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून 'कम, मेक इन इंडिया' आणि 'मेड इन इंडिया' या घोषणा दिल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर, ट्वीटस् आणि काही गमतीशीर फोटो...