नवी दि्ल्ली -
लोकसभा निवडणूक 2014 मध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसने उपाध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिमा निर्णायक नेत्याच्या रुपात ठसवण्याची रणनीती आखली आहे. या वर्षात काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, त्यानंतर पक्षात मोठे फेरबदल केले जाणार आहेत. त्याआधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांची निर्णायक आणि संघर्षशील नेत्याच्या रुपात प्रतिमा तयार करण्याचे ठरविण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या बदललेल्या प्रतिमेची झलक संसदेत नुकतीच पाहायला मिळाली होती.
राहुल गांधी यांच्या ब्रँडिंगची जबाबदारी काँग्रेसच्या एका टीमवर देण्यात आली आहे. या टीममध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा, राहुल गांधी यांच्या गोटातील मोहन गोपाल, राहुल यांच्यासाठी भाषण लिहून देणारे जयराम रमेश आणि काही टेक्नोक्रॅट आहेत.
काय परिणाम होईल
संसदेत काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने जातिय हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी चर्चेची मागणी करत आक्रमक झालेले राहुल गांधी पाहायला मिळाले होते. सुत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी आता पक्षाच्या मुख्यालयात सर्वाधिक वेळ उपस्थित राहातील. याआधी ते घरूनच काम पाहात होते. पक्षाच्या कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांशी थेट संपर्क वाढेल आणि स्थानिक पातळीवर काय सुरु आहे. जनतेच्या काय
आपेक्षा आहेत हे जाणून घेण्यास मदत होईल.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काँग्रेस उपाध्यक्षांसमोरील आव्हाने