आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Issue At Delhi For Railway Minister Resign Issue

राजीनाम्यानंतर काँग्रेसचा नैतिकतेचा टेंभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय रेल्वमंत्री पी.के. बन्सल आणि अश्विनीकुमार प्रकरणात ‘कडक कारवाई’ करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता करण्यात आली, असे काँग्रेसकडून सांगितले जाते. त्यावरून राजीनाम्याच्या प्रकरणात काँग्रेस नैतिकतेचा टेंभा मिरवण्यात धन्यता मानत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसने कारवाई केली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही परिस्थितीत अशा गोष्टींना क्षमा केली जाणार नाही. इतिहास या गोष्टींचा साक्षीदार आहे. शुक्रवारच्या घटनांतून हेच सिद्ध झाले आहे. पक्ष खोट्या शब्दांवर विश्वास ठेवत नाही, असे पक्षाचे प्रवक्ते भक्तचरण दास यांनी सांगितले. हा निर्णय अगदी योग्य असल्याचे सांगून काँग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी त्याचे समर्थन केले. भाजपने मात्र हे आमच्या पक्षात कदापि घडू दिले जात नसल्याचे म्हटले आहे. दोन्ही मंत्र्यांनी काही चूक केली असल्याचे स्पष्ट असेल तर काँग्रेस अध्यक्षा आणि पंतप्रधान यांच्याकडून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जातो.

विरोधी पक्षावर राग : काँग्रेसने वरून नैतिकतेचा आव आणला असला तरी पक्षाने मनातील राग मात्र भाजपवर काढला आहे. भाजपने संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घातला आहे. मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीच्या अगोदरपासूनच भाजपने गोंधळ केला होता, असे काँग्रेसचे प्रवक्ते भक्तचरण दास यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीची साथ
केंद्रातील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे आरोप फेटाळून लावले. विरोधकांनी केलेल्या चुकीच्या वर्तणुकीमुळे संसदेचा वेळ वाया गेला आहे. भाजपने सहकार्य केले असते तर वेळ वाचवता आला असता, असे पक्षाचे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी यांनी सांगितले.