आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अयोध्येची मॅच फिक्स- दिग्विजय सिंह; दिल्लीला परतण्यास सिंघल यांचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विश्‍व हिंदू परिषदेतर्फे आयोजित 84 कोसी परिक्रमावरून राजकारण तापत चालले आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी या यात्रेवर प्रश्न उपस्थित करत 'अयोध्येची मॅच फिक्स' असल्याची टिका केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल, प्रवीण तोगडि‍यांसह अनेक कार्यकर्त्‍यांना अटक करण्यात आली आहे.

सिंघल यांचा दिल्लीला परत जाण्यास नकार

विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल 84 कोसी परिक्रमेत सहभागी होण्यासाठी अयोध्येकडे जात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे. ते दिल्लीहून विमानाने लखनौला आले. लखनौ विमानतळावरच त्यांना अटक करण्यात आली आहे. सिंघल यांच्यासमोर पोलिसांनी एक अट ठेवली होती. दिल्लीला परत गेल्यास अटक टळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी परत जाण्यास नकार दिला.

विहिंपची वेबसाइट बंद
विहिंपची वेबसाइट बंद करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील विहिंपचे पेज देखील ब्लॉक करण्यात आले आहेत. राम जन्मभूमी न्यास परिषदेचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांना अटक करण्यात आली आहे. ते त्यांच्या आश्रमाकडून शरयू घाटाकडे निघाले होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक करण्याची सुचना दिली होती. मात्र, पोलिसांना चकमा देऊन ते शरयू घाटावर पोहोचण्यात यशस्वी झाले. त्यांनी तिथे काही साधु-संतासह पुजा केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. बस्तीमधील मखौडा येथे शेकडो विहिंपच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.