आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तडीपारांनी आम्हाला इतिहास शिकवू नये, कपिल सिब्बल यांचा शहांना टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय लष्कराने पाकच्या भूमीत घुसून केलेल्या 'सर्जिकल स्टाईक'वरून आता सत्ताधारी आणि विरोधकांंमध्ये 'शब्दीक स्ट्राईक' सुरु झाले आहे. लष्कराच्या कारवाईवरुन भाजप-काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. ज्यांच्यावर हत्येचे गुन्हे आहेत, ज्यांनी तुरुंगाची हवा खाल्ली असलेल्या तडीपारांनी आम्हाला इतिहास शिकवू नये, अशा शब्दात कॉंंग्रेेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी भाजपचे राष्ट्र‍ीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे.

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या भूमित घुसून केलेल्या 'सर्जिकल स्टाईक'वरून आता सत्ताधारी आणि विरोधकांंमध्ये 'शब्दीक स्ट्राईक' सुरु झाले आहे. भाजप-काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवानांच्या रक्ताची दलाली करत आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केला होता. त्यावर आज, शुक्रवारी अमित शहा यांनी राहुल गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला. मोदी सरकार शहिदांच्या रक्ताचे राजकारण करत नसून दलाली ही काँग्रेसच्या रक्तात भिनलेली आहे, असा पलटवार केला आहे. त्यासोबतच राहुल गांधी यांनी बटाट्याच्या कारखान्यावर लक्ष देण्याचा टोलाही शहांनी लगावला. राहुल गांधींनी शहीदांचा अपमान केला. संपूर्ण देश जवानांच्या पाठीशी असल्याचे शहांनी म्हटले आहे.

यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत भाजपवर पलटवार केला. भाजप एवढ्या खालच्या स्तराला जाईल, असे वाटले नव्हते.

पुढील स्लाइडवर वाचा, कपिल सिब्बल म्हणाले, 'जैश-ए-मोहम्मद' भाजपचे पिल्लू...
बातम्या आणखी आहेत...