Home »National »Delhi» Congress Leader Mani Shankar Aiyyar Comment On PM Modi

जातीच्या अर्थाने नीच शब्द वापरला नव्हता, त्याचा तसाही अर्थ असेल तर माफी मागतो-अय्यर

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 18:47 PM IST

  • मणिशंकर अय्यर यांनी मोदी यांच्या वक्तव्याबाबत बोलताना म्हणटले की, एवढे घाणेरडे राजकारण करण्याची गरजच नाही.

नवी दिल्ली - डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या उद्घाटनावेळी नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना मारलेल्या टोमण्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले, मला वाटते हा व्यक्ती फारच नीच आहे. त्याच्यात जराही सभ्यपणा नाही. अशावेळीही एवढे घाणेरडे राजकारण करण्याची गरजच काय.

मोदींच्या टीकेनंतर म्हणाले, तशा अर्थाने म्हणालो नाही..

या प्रकारावरून मोठा गदारोळ होणार हे लक्षात येताच, मणिशंकर अय्यर यांनी या प्रकरणी सावध भूमिका घेतली आहे. नीच हा शब्द मी जातीच्या अर्थाने वापरला नव्हता. त्याचा तसाही अर्थ असेल तर मी माफी मागतो, असे मणिशंकर अय्यर म्हणाले. राहुल गांधीं यांनीही अय्यर यांचे हे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले होते आणि त्यांना माफी मागण्यास सांगितले होते.

उद्घाटनावेळी राहुल गांधींचे नाव न घेता मणिशंकर अय्यर म्हणाले होते, ज्या राजकीय पक्षांनी बाबासाहेबांच्या नावाने राजकारणावर केले आहे, पण त्यांना आता बाबासाहेबांपेक्षा भोलेबाबा अधिक आठवत आहेत.


राहुल गांधींबाबत काय म्हणाले होते मोदी..
- आपण हे मान्य करायला हवे की, बाबासाहेबांचे स्वप्न आपण पूर्ण करू शकलेलो नाही. आजच्या पिढीमध्ये जी क्षमता आहे ती समाजातील अनिष्ठ बाबी संपवू शकते. हा देश जाती नावावर विभाजन केल्यास पाहिजे तेवढ्या वेगाने विकास करू शकणार नाही.
- यावेळी राहुल गांधींच्या मंदिर भेटींवरही मोदींनी हल्ला केला. राहुल गांधींचे नाव न घेता मोदी म्हणाले, राजकीय पक्ष बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करतात. पण त्यांना आता बाबासाहेबांपेक्षा बाबा भोले अधिक आठवत आहेत.

Next Article

Recommended