नवी दिल्ली- रोहित शेखर हा माझाच मुलगा आहे. मी त्याचा आता स्वीकार करीत आहे. न्यायालयीन लढाईला आता कंटाळलो आहे, असे सांगत काँग्रेसचे नेते एन. डी. तिवारी यांनी याप्रकरणातून माघार घेतली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहिलेल्या व गांधी परिवाराचे निकटवर्तीय समजले जाणा-या तिवारींची या प्रकरणामुळे नाचक्की झाली होती. मात्र डीएनए चाचणीत एन. डी. तिवारीच रोहित शेखरचे वडील असल्याचे सिद्ध झाल्यानंतर या प्रकरणात मागे सरण्यावाचून पर्याय राहिला नव्हता. अखेर न्यायालयीन लढाईला कंटाळलेल्या तिवारींनी रविवारी सायंकाळी रोहित शेखर व त्याच्या आईला (उज्ज्वला शर्मा) बोलावून मी तुझा मुलगा म्हणून स्वीकार करीत असल्याचे सांगितले. तसेच कोर्टातून ही केस माघारी घ्यावी असे सांगितले. त्यानंतर रोहित शेखरनेही त्यास प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे.
एन. डी. तिवारी माझे वडील असल्याचे दिल्लीतील रोहित शेखर हा युवक अनेक वर्षांपासून दावा करीत होता. पण त्याच्याकडे एन. डी. तिवारींनी प्रथम दुर्लक्ष केले. नंतर मात्र रोहित शेखरने या घटनेचा पिच्छा पुरवल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले व टिकलेही. अखेर काही वर्षांनी रोहितचे पिता एन. डी. तिवारी हेच आहेत हे सिद्ध झाले. त्यानंतर रोहित शेखरच्या लढाईला यश येणार हे गृहित धरले गेले होते. दुसरीकडे, तिवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असल्याने या प्रकरणी तिवारींसह काँग्रेसची नाचक्की होत होती. अखेर एन. डी. तिवारींनी माघार घेतली व रोहित शेखर आपलाच मुलगा असल्याचे स्वीकारले आहे.
पुढे वाचा, एन डी तिवारी आणि उज्ज्वला शर्मा हे कसे भेटले? आणि रोहितचा जन्म कसा झाला याची खरी-खुरी कहाणी...