आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Says One Can Have Meal In Five Rupees

काँग्रेस नेत्यांना पाच रुपयांत पोटभर जेवण, रशीद मसूद यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कॉँग्रेस देशात गरीबीचा स्तर घटल्याचे दाखवण्यासाठी एवढी उतावीळ झाली की, त्या पक्षाच्या नेत्यांना प्रत्येक वस्तू स्वस्त वाटू लागली आहे. कॉँग्रेस नेते रशीद मसूद यांनी दिल्लीत पाच रुपयांत तर राज बब्बर यांनी मुंबईत 12 रुपयांत पोटभर जेवण मिळत असल्याचा दावा केला आहे.

एकावेळेस पाच रुपयांमध्ये जेवण करता काय? अशी विचारणा मसूद यांना केली तेव्हा त्यांनी सांगितले की, मी पाच रुपयांपेक्षा कमी पैशात जेवतो. डॉक्टरांनी अनेक पदार्थ न खाण्याची मनाई केली आहे. त्याआधी राज बब्बर यांनी मुंबईत 12 रुपयांमध्ये ताटभर दाळभात मिळत असल्याचे सांगितले.

गुरुद्वारात मोफत जेवण : त्यागी जदयुचे नेते के.सी. त्यागी यांनी रशीद यांच्या उत्तरावर प्रतिक्रिया देत म्हटले की, माझे घर गुरुद्वारा रकाबगंज साहिब आहे. तेथे रोजच्या लंगरमध्ये मोफत जेवण मिळते. कॉँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे.

33 रुपयांत एक किलो तांदूळ मिळणेही कठीण
नियोजन आयोगाने दारिद्र्याच्या केलेल्या व्याख्येतून जगण्यासाठी झगडणार्‍या नागरिकांची खिल्ली उडवली, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते सीताराम येचुरी यांनी केला. वाढत्या महागाईत गरिबांच्या सबसिडीमध्ये मोठी कपात केली जात आहे.