आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Leader Senior Leader Priya Ranjan Dasmunsi Passes Away At The Age Of 72

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन, 9 वर्षांपासून होते कोमात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे सोमवारी निधन झाले. ते 9 वर्षांपासून कोमात होते. यूपीए 1 सरकारमध्ये ते मंत्री होते. मृत्युसमयी त्यांचे वय 72 वर्षे होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी दीपा दासमुन्शी आणि मुलगा प्रियदीप आहेत. 2004 मध्ये बंगालच्या रायगंज मतदारसंघातून लोकसभेत ते अखेरचे निवडून गेले होते. 2008 मध्ये त्यांना स्ट्रोक आणि पॅरालिसिस झाला. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

9 वर्षांपासून अपोलो रुग्णालयात होते दासमुन्शी
- दासमुन्शी प. बंगालमधून काँग्रेसचे लोकसभा खासदार होते. 2008 मध्ये त्यांना स्ट्रोक आणि पॅरालिसिस झाला होता. यानंतर दासमुन्शी बोलू शकत नव्हते. त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात ठेवण्यात आले होते. यूपीए सरकार असताना ते इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मंत्री होते.
- पॅरालिसिसनंतर त्यांच्या मेंदूचा रक्तपुरवठा बंद झाला होता. तथापि, शरीराच्या इतर भागाला जास्त नुकसान झाले नव्हते. तथापि, मेंदूच शरीराच्या सर्व अवयवांचे नियंत्रण करतो, यामुळै दासमुन्शी 9 वर्षे बेडवरच होते. श्वास घेण्यासाठी त्यांच्या गळ्यात एक ट्यूब (tracheostomy) टाकण्यात आली होती. याशिवाय पोटात एक नळी टाकण्यात आली होती. याद्वारे दासमुन्शी यांना लिक्विड डाएट देण्यात येत होती. त्यांना जवळचे व्यक्तीही ओळखू येत नव्हते.
- 2014 मध्ये एनडीए सत्तेत आल्यावर केंद्राने म्हटले होते की, सरकार दासमुन्शी यांच्या उपचारांचा खर्च उचलणे सुरूच ठेवणार आहे.
- दासमुन्शी यांच्या पत्नीही काँग्रेसमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...