आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Shashi Tharoor Reaches Police Station

सुनंदा पुष्कर प्रकरण : दिल्लीतील सरोजनी नगर पोलिस ठाण्यात शशी थरूर यांची चौकशी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यू प्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांची दिल्लीच्या सरोजनी नगर पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) त्यांची चौकशी करत आहे.

कोणत्याही राजकीय दबावात सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात येऊ नये अशी अपेक्षा शशी थरूर यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. दरम्यान, विशेष तपास पथकाने याआधीच थरूर यांचे मित्र, घरात काम करणारे नोकर यांच्यासह अनेकांची चौकशी केली आहे. सुनंदा पुष्कर यांच्या लाळेचे नमुणेही तपासासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या प्रकरणामध्ये एकापाठोपाठ एक अनेक खुलासे झाले होते. त्यामध्ये शशी थरूर आणि सुनंदा यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सुनंदा आणि थरूर यांनी प्रवास केलेल्या विमानाच्या पायलटसह क्रू मेंबर्सची चौकशी पोलिसांनी केली होती. त्यात विमानतळावर दोघांमध्ये झटापट झाल्याचे पोलिसांना समजले. तसेच थरूर आणि सुनंदा यांच्यात पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांच्यावरून वाद विकोपाला गेल्याची माहितीही समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिस थरूर यांची चौकशी करत आहेत.