आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Shashi Tharur In Sunanda Pushkar Murder Mistry

सुनंदा मर्डर मिस्‍ट्री: शशी थरुर यांच्या अटकेची, कॉंग्रेसचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी आज (बुधवार) सांगितले, की या प्रकरणी जे काही करायला हवे ते आम्ही करीत आहोत. यापूर्वीही आम्ही शशी थरुर यांची चौकशी केली होती. पुढे गरज भासल्यास पुन्हा चौकशी केली जाईल.
दुसरीकडे, कॉंग्रेसमध्ये शशी थरुर यांना पक्षातून बाहेर काढण्याची मागणी जोर पकडत आहे. यासंदर्भात कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी दुरध्वनीच्या माध्यमातून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आहे.
थरुर यांची चौकशी आवश्यक
सुनंदा यांच्या विश्वासू राहिलेल्या वकील आभासिंह यांनी सांगितले, की थरुर यांना अटक करुन लगेच चौकशी करण्याची गरज आहे. त्यांची चौकशी केल्याशिवाय सत्य समोर येणार नाही. सुनंदा यांची मैत्रिण आणि पत्रकार नलिनीसिंह यांनी सांगितले, की लिला हॉटेल पंचतारांकीत आहेत. सुनंदा यांची हत्या झाली तेव्हा गॅलरीतील सीसीटीव्ही का काम करीत नव्हते. हा केवळ योगायोग समजावा की आणखी काही...
पत्रकारांनी सत्य समोर आणावे
सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचा दावा करणारे वकील आणि माजी केंद्रीयमंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी पाच पत्रकारांची साक्ष महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले आहे. राहुल कंवल, बरखा दत्त, प्रेमा शंकर देवी, सागरिका घोष आणि नलिनीसिंह यांनी साक्ष द्यावी असेही ते म्हणाले आहेत.
डॉक्टरही म्हणाले...
एम्सचे डॉक्टर सुधिर गुप्ता यांनी सुनंदा यांच्या मृत्यूला संशयित म्हटले होते. त्यांनी आज सांगितले, सुनंदा यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची तपासणी करणाऱ्या मेडिकल बोर्डमध्ये तीन डॉक्टर होते. आता या प्रकरणी चौकशी करण्याचे काम पोलिस आणि चौकशी यंत्रणेचे आहे. एक डॉक्टर या नात्याने मी रिपोर्ट तयार केला होता. त्यावर मेडिकल बोर्डाने आपले ओपिनियन दिले आहे. गुप्ता प्रसिद्ध फॉरेंसिंक एक्सपर्ट आहेत.
कॉंग्रेसचे आहिस्ते कदम
कॉंग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, की या प्रकरणाला वादग्रस्त केले जात आहे. ठोस पुरावे पुढे येण्याची जरा वाट बघितली पाहिजे. या प्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे हत्येचे प्रकरण आहे की आत्महत्येचे हे अद्याप सिद्ध झालेले नाही. पोलिसांनी निष्पक्ष राहून चौकशी करायला हवी. दुसरीकडे कॉंग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी सांगितले आहे, की कुणावर आरोप करणे अत्यंत धोकादायक आहे. सुनंदा यांची हत्या कुणी केली हे आधी पुढे तर येऊ द्या...
पुढील स्लाईडवर वाचा, सुनंदा पुष्कर यांना कशा स्वरुपाचे विष देण्यात आले होते....