आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Leaders Singing Song Of Victory Of Sangali

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सांगली’चे पोवाडे गात काँग्रेसचे राहुलना साकडे; निवडणुकीबाबत चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सांगली मनपा निवडणुकीत राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता काबीज केल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. लोकसभा व विधानसभा निवडणूक रणनीतीबाबत या नेत्यांनी राहुल यांच्याशी चर्चा केली. काँग्रेस-राष्‍ट्रवादी समन्वय समितीची बैठक घेण्याविषयी साकडेही घातले.


गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे यांची या वेळी उपस्थिती होती. भावी प्रदेशाध्यक्ष म्हणून नावाची चर्चा होत असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सांगली निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे केंद्रीय मंत्री प्रतीक पाटीलही या वेळी हजर होते. सांगली निवडणुकीत राष्ट्रवादीकडून झालेल्या टीकेचा पाढाही या वेळी वाचण्यात आला. या निवडणुकीनंतर आगामी निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्यात, असा मतप्रवाह होता.