आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमध्‍ये \'पंजा\'च्‍या फटक्‍याने \'कमळ\' भुईसपाट, जनता दलाची उसळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु- कर्नाटकमध्‍ये सत्ता परिवर्तन झाले असून, बहुतांश जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. काँग्रेसने सर्वांधिक 121 जागा, जनता दल (धर्मनिरपेक्ष) 40 जागा, भाजप 40, केजीपी 6 तर, इतर व अपक्ष 16 जागांवर निवडून आले आहेत.


भाजपचे माजी मुख्‍यमंत्री सदानंद गौडा यांना पराभवाचा धक्‍का बसला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सर्वांधिक नुकसान झाले आहे. भाजपची स्थिती अतिशय बिकट बनली असून सत्ता गमावल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नसल्याचे दिसते. त्या उलट माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या जेडीएसने जोरदार मुसंडी मारली. तसेच आपण विरोधी बाकांवर बसणार असल्‍याचे पक्षाचे प्रमुख देवेगौडा यांनी स्‍पष्‍ट केले आहे. तर महाराष्‍ट्र एकीकरण समितीचे दोन आमदार निवडून गेले आहेत. संभाजी पाटील आणि अरविंद पाटील यांचा विजय झाला आहे.

भाजपचे एकूण 12 मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्‍यात माजी मुख्‍यमंत्री सदानंद गौडा तसेच विद्यमान उपमुख्‍यमंत्री के. एस. ईश्‍वरप्‍पा यांचाही समावेश आहे. माजी मुख्‍यमंत्री कुमारस्‍वामी यांच्‍या पत्‍नी अनिता यांना समाजवादी पार्टीच्‍या उमेदवाराने पराभवाचा धक्‍का दिला आहे.

माजी मुख्‍यमंत्री बी. एस. येडीयुरप्‍पा यांच्‍या केजीपीला 6 ठिकाणी विजय मिळाला. स्‍वतः येडीयुरप्‍पा शिकारपुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. याशिवाय इतर ठिकाणी केजीपीचा प्रभाव दिसून आलेला नाही. भारतीय जनता पार्टीच्‍या उमेदवारांना मात्र येडीयुरप्‍पांचा फटका बसलेला दिसत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्‍ये भाजप नेते नरेंद्र मोदी यांची किमया दिसली नाही. त्‍याचप्रमाणे राहुल गांधी यांनाही फारसे यश मिळालेले नाही. कॉंग्रेसला जरी बहुमतापर्यंत मजल मारता येत असल्‍याचे चित्र असले तरीही त्‍यात राहुल गांधींचा प्रभाव कमी आहे. भाजपचा अंतर्गत कलह आणि सरकारविरोधी लाटेमुळे कॉंग्रेसला फायदा झाल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. माजी मुख्‍यमंत्री सदानंद गौडा यांनाही पराभवाचा धक्‍का बसला आहे. कॉंग्रेसच्‍या उमेदवाराने त्‍यांचा पराभव केला. यावरुन भाजपची स्थिती स्‍पष्‍ट होत आहे.

महाराष्‍ट्र एकीकरण समितीनेही मुसंडी मारली आहे. वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये....


कर्नाटकमधील पक्षीय बलाबल

कॉंग्रेस - 121
भाजप - 40
जेडीएस - 40
केजीपी - 6
महाराष्‍ट्र एकीकरण समिती- 2
समाजवादी पार्टी- 1
इतर- 13