आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Lose, BJP Get ; Various Survey Poll Observation

काँग्रेसला फटका, भाजपला लाभ; वृत्तवाहिन्यांच्‍या सर्वेक्षणात चित्र स्पष्‍ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जर आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर काँग्रेस आणि संपुआला मोठय़ा नुकसानीस सामोरे जावे लागेल आणि भाजप व एनडीएला फायदा होईल, असे सी व्होटर्स, टाइम्स नाऊ, इंडिया टीव्ही यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सरकार स्थापनेसाठी समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि डाव्या पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील,. कारण संपुआ आणि एनडीएच्या तुलनेत अन्य पक्षांना अधिक जागा मिळतील, असे सर्वेक्षणातून दिसत आहे.

सव्र्हेनुसार गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या वर्चस्वामुळे भाजपला 21, तर काँग्रेसला 5 जागा मिळू शकतात. मध्य प्रदेशमध्ये 2009 च्या निवडणुकीप्रमाणेच परिस्थिती राहील. काँग्रेसला 12, तर भाजपला 12 जागा मिळतील, असे संकेत दिले आहेत. मध्य प्रदेशात बसपलादेखील एका जागेवर विजय मिळू शकतो. दिल्लीमध्ये मात्र काँग्रेसची परिस्थिती नाजूक दिसून येत आहे. सर्वेक्षणानुसार येथे काँग्रेसला केवळ एकच जागा, तर भाजपला मात्र 6 जागा मिळू शकतात. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची संख्या चारवर पोहोचू शकते. तर येथे भाजपला सात जागा मिळतील. राजस्थानात काँग्रेसला 11 जागी नुकसान दिसून येते. त्यांना नऊ, तर भाजपला 15 जागांवर विजय मिळू शकतो. हरियाणा, पंजाबमध्ये काँग्रेसला नुकसान होईल. तर हिमाचलमध्ये काँग्रेस आणि भाजपची बरोबरी होऊ शकते.


जागांचे गणित
लोकसभेच्या एकूण जागा 543
एनडीए 156 (भाजप 131, शिवसेना 15, अकाली दल 7, मनसे 3)
संपुआ 136 (काँग्रेस 119, राष्ट्रवादी 6, रालोद 3, नॅशनल कॉन्फरन्स 2, अन्य लहान पक्ष 6)
अन्य सर्व 251 (सपा 33, डावे पक्ष 33, अण्णा द्रमुक 29, बसप 28, तृणमूल 22, वायएसआर काँग्रेस 14, बिजू जनता दल 13, राजद 12, जदयू 11, टीआरएस 11, डीएमके 5, अपक्ष आणि अन्य 40)

राज्य एकूण जागा काँग्रेस भाजप इतर (कंसात2009 मध्ये मिळालेल्या जागा)
मध्य प्रदेश 29 12 16 1 (बसप)
राजस्थान 25 9(20) 15(4) 1(अपक्ष)
महाराष्ट्र 48 11(17) 11 (9) 11(15 शिवसेना), राष्ट्रवादी 8(6)मनसे 3
गुजरात 26 5 (11) 21(15)
छत्तीसगड 11 4(1) 7(10)
दिल्ली 7 1(7) 7(10)
हरियाणा 10 6(9) 2(0) 2(0, इनेलो) हजकाँ 1(0)
पंजाब 10 6(9) 2(0) शिरोमणी अकाली दल 7(4)
झारखंड 14 4(1) 3(8) जेव्हीएम 3(1) जेएमएम 3(2) अपक्ष 1
बिहार 40 1(2) 14 राजद 12(4), जदयू 11(20), लोजपा 1
पश्चिम बंगाल 42 2(6) 0(1) डावे 17, तृणमूल 22(19), अपक्ष 1
अरुणाचल 2 1(2) 1 (0)
गोवा 2 1 1
कर्नाटक 28 17 (6) 8 (19) जेडीएस 3(3)
आसाम 14 8(7) 2(4) एजीपी2(1), यूडीएफ आणि बीपीएफ 1-1
आंध्र प्रदेश 41 7 (33) 0 टीडीपी 9 (6), वायएसआर काँग्रेस-14 (0), टीआरएस 11(0)