आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress May Bring Priyanka To Rajyasabha And Rahul May Become President

बहिणीच्या इच्छेनुसार राहुल पक्षाध्यक्षपद स्वीकारणार? प्रियंका खासदार होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- होय, अखेर प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेऊ शकतात. याबाबत वृत्त आहे की, काँग्रेसच्या युवा नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या सततच्या मागणीमुळे प्रियंका गांधी राज्यसभेच्या खासदार बनू शकतात. दरम्यान, प्रियंका यांच्या इच्छेखातरच येत्या मार्च महिन्यात राहुल यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा गंभीर विचार सुरु आहे.
प्रियंका राज्यसभेवर जाणार-
गेली अनेक वर्षे प्रियंका यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी पक्षाच्या युवा नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे. खासकरून यूपीतील अनेक शहरांतून तशी मागणी पुढे आली आहे. मात्र, पक्ष आता या मागणीकडे गंभीरतेने पाहत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी राज्यसभेचे खासदारपद स्वीकारण्यास तयार झाल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेस हायकमांड विचार करीत आहे की, प्रियंकाला खासदार केल्यानंतर पक्षाला फायदा होईल व तसेच राहुल यांना वन स्टेप प्रमोशन देत अध्यक्षपद दिल्यास गटतटही पडणार नाहीत.
मार्चमध्ये राहुल घेणार सोनियांची जागा?
राहुल गांधी मार्चमध्ये होणा-या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले जाऊ शकतात. पुढच्याच महिन्यात नवी दिल्लीत काँग्रेसची एक बैठक होत आहे. याच बैठकीत राहुल यांच्याकडे पक्षाची धुरा देण्याचे निश्चित केले जाईल. राहुल गांधी सध्या पक्षाचे उपाध्यक्ष आहेत तर सोनिया गांधी पक्षाध्यक्ष आहेत. राहुल यांना आताच अध्यक्षपद दिले पाहिजे असा सूर खुद्द प्रियंका गांधींचाच असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. राहुल यांच्याकडे पक्षाची संपूर्ण जबाबदारी देऊन त्यांना त्यांच्यापद्धतीने काम करून दिले पाहिजे असे मत प्रियंका गांधींनी व्यक्त केल्याचे समजते आहे.
पुढे वाचा, काँग्रेसचा आणखी एक बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत..