नवी दिल्ली- देशाचे माजी परराष्ट्र मंत्री आणि कोणे एके काळी गांधी कुटूंबीयांचे निकटवर्तीय समजले जाणारे नटवर सिंह हे सध्या चर्चेत आले आहेत. नटवर यांनी आपल्या आत्मकथनात सोनिया गांधींबाबत खळबळजनक खुलासा करून राजकीय वर्तुळात रान पेटवले आहे. त्यात आता स्वत: नटवर सिंह यांनी तेल ओतण्याचेही काम केले आहे. कॉंग्रेसने आपल्यावर खूप अन्याय केला आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी फार कठोर असल्याचा आरोप करून नटवर सिंह यांनी केला आहे.
नटवर सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत कॉंग्रेसने आपल्यावर मोठा अन्याय केल्याचा आरोप केला आहे. परंतु आपण या वैरभावातून आत्मकथन लिहिलेले नसल्याचेही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पुस्तकाबाबत मला अनेकांचे फोन आले. पुस्तक लिहून योग्य केल्याचेही त्यांनी सांगितले. सोनिया गांधी फारच कठोर आहेत. मात्र, सोनियांनी यशस्वीपणे कॉंग्रेसचे नेतृत्त्व केले आहे. कॉंग्रेसचे नेतृत्त्व त्यांच्याकडून काढून घेतले तर कॉंग्रेस पक्ष संपुष्ठात येईल, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
'दिवंगत राजीव गांधी असते तर कदाचित माझ्यावर अन्याय झाला नसता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मी 'बिना रीढ का' असे संबोधित केले होते. कारण, प्रत्येक सरकारी फाईल सोनिया गांधींकडे निरीक्षणासाठी पाठवली जात होती. पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनीही यापूर्वी आवाज उठवला होता. आज मी सांगत आहे. उद्या कदाचित सगळेत सांगतील,' नटवर सिंह यांनी सांगितले.
दुसरीकडे, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नटवर सिंह यांना गुरुवारी प्रत्युत्तर दिले होते. 'मी स्वत: पुस्तक लिहीन तेव्हा सर्व सत्य बाहेर येईल, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नटवर सिंह यांनी केलेला खळबळजनक खुलासा...