आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. परंतु, 'आप'चे सरकार ज्या कॉंग्रेस पक्षाच्या पाठींब्यावर सत्तेवर येत आहे, त्या पक्षाचे 5 आमदार पडद्यामागे केजरीवाल यांच्याविरोधात गरळ ओकत आहेत. एका वृत्तवाहिनीने स्टींग ऑपरेशन करुन कॉंग्रेसच्या आमदारांचा खरा चेहरा समोर आणला आहे. हे आमदार सभ्यतेच्या मर्यादांचे उल्लंघन करुन केजरीवाल यांना 'पागल' आणि 'माकड' म्हटत असल्याचे स्टींग ऑपरेशनमध्ये दाखविण्यात आले आहे.
कॉंग्रेसचे सुल्तानपुर माजर (फोटोमध्ये) येथील आमदार म्हणतात, केजरीवाल यांना माझ्यासारखा कोणीतरी सभागृहात जोडा मारेल. माकड आहेत. माकडाच्या हातात माचिस देण्यात आली आहे. माकडाच्या हातात वस्तरा देण्यात आला आहे. आता काय होणार... केजरीवाल यांना नशा चढली आहे. ही नशा उतरून जाईल.
ओखला येथील आमदार आसिफ मोहम्मद खान केजरीवाल यांना पागल म्हणत असल्याचे स्टींगमध्ये दिसून येते. आम्ही तर त्यांना संपविण्यासाठीच पाठींबा दिला आहे.
कॉंग्रेसच्या आमदारांना अशा प्रकारे बोलताना पाहणे धक्कादायक आहे. काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी, आम्हाला आम आदमी पार्टीपासून बरेच काही शिकण्यासारखे आहे, असे म्हटले होते. परंतु, त्यांचेच आमदार असे बोलताना स्टींगमध्ये दिसत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.