आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress MP Mallikajun Kharage News In Marathi, Parliament

काँग्रेसचे खासदार कौरवांना भिणार नाहीत; मल्लिकार्जुन खारगेंचे भाजपला प्रत्युत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणावर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा सुरू झाली. ही चर्चा बुधवारीही सुरू राहील. चर्चेदरम्यान काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खारगे यांनी राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे यूपीए आघाडी सरकारच्या धोरणांची कॉपी असल्याची टीका केली. त्यांनी मनमोहनसिंग सरकारच्या वेगवेगळ्या कामांचा उल्लेख केला. ‘आज आम्ही भलेही 44 खासदार असू्. परंतु पांडव कधीच कौरवांना घाबरणार नाहीत. मुकाबला करू आणि पुन्हा जिंकू.’

भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी धन्यवाद प्रस्ताव लोकसभेत मांडला. लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामविलास पासवान यांनी त्याचे समर्थन केले. तर मल्लिकार्जून खारगे यांनी त्याला उत्तर दिले. रुडी यांनी 35 मिनिटांच्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्या हिंमतीची कहानी व त्यांच्या सरकारची आश्वासने सांगितली. लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले. त्याचेवळी अवघ्या 44 जागांवर थांबलेल्या काँग्रेसला तो प्रादेशिक पक्ष असल्याचा टोमणा लगावल. त्यामुळे संतप्तत खारगेंनी त्यांच्या भाषणात कौरव पांडवांची उपमा देत एनडीएला 31 टक्के मते मिळाली आहेत. परंतु उर्वरीत 69 टक्के कौल आमच्याकडे असल्याचे स्पष्ट केले. भाजप 200च्या पुढे जाऊ शकते तर आम्ही 44 वरून 444 वर जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. धन्यवाद प्रस्तावावर बुधवारीही चर्चा चालणार असून शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला उत्तर देणार आहेत.

रुडींना व्यंकय्या नायडूंनी फटकारले
राजीव प्रताप रुडी यांना लोकसभेत त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडूंकडून बोलणी खावी लागली. रुडी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की, ‘साहब और मेमसाब आज दोनो भी संसद मे नही है’ त्यांचा इशारा राजद नेते लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवींकडे होता.त्यावर राजदचे खासदार पप्पू यादव यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर नायडू उभे राहिले व म्हणाले, ‘मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची खासगी टिप्पणी कुणीही करू नये. माझी सूचना आमच्या पक्षातील सहकारी तसेच विरोधी पक्षातील खासदारांसाठीही आहे.’'

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, गोध्राच्या नावाने आताच गळा का? पासवानांचा काँग्रेसला प्रश्न