आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेत गोंधळ घालणारे काँग्रेस खासदार निलंबित, माफीनंतरही एक दिवस राहावे लागले बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभेत कामकाजादरम्यान गोंधळ घालणारे काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना सोमवारी लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केले. चौधरी यांनी माफी मागितल्यानंतरही त्यांना दिवसभरासाठी सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले.

चौधरी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक सदस्य ललित मोदी प्रकरण तसेच व्यापमं घोटाळ्यावरुन गोंधळ घालत होते. याप्रकरणी पंतप्रधानांनी उत्तर द्यावे तसेच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांच्याकडून राजीनामा घ्यावा, अशी विरोधकांची मागणी होती. दरम्यान, सभागृहात दिल्ली उच्च न्यायालयाशी संबंधीत विधयेकावर चर्चा सुरू होती आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन या गोंधळात कामकाज व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. याच दरम्यान सभागृहाच्या मधोमध येऊन चौधरी यांनी त्यांच्याकडील फाईल अध्यक्षांच्या पटलावर आदळली. त्यानंतर प्रचंड गोंधळ झाल्याने अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज एका तासासाठी तहकूब केले. चार वाजता पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी चौधरी यांचे वर्तन अपमानजनक असल्याचे सांगत त्यांच्यावर निलंबानाची कारवाई केली.

हक्कभंगाच्या नोटीसवर वाड्रांकडून उत्तर मागवले
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवरून केलेल्या टीकेबाबत लोकसभा सचिवालयाने सात दिवसांत उत्तर मागवले आहे. भाजपचे अर्जुन मेघवाल यांनी वाड्रा यांनी केलेली टीका संसदेच्या प्रतिमेला तडा पोहोचवणारी असल्याचे म्हटले आहे. मेघवाल यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटिस बजावली आहे. वाड्रा यांनी संसदेतील गोंधळाबाबत टीका करत म्हटले होते, संसद सुरू झालीय आणि त्यांचे विभाजनकारी राजकारणही. भारतातील लोक मुर्ख नाहीत. कथित नेतेच देशाचे नेतृत्व करत असल्याचे मला दु:ख वाटते. काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले, ज्या व्यक्तीविरुद्ध नोटीस जारी झाले आहे. त्याचे त्यानेच उत्तर द्यायला हवे. जेव्हा नोटीस संबंधीतास मिळेल. तेव्हा, संसदेची प्रतिमा लक्षात घेऊन त्याचे उत्तर दिले जाईल.