आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Nationalist Conference Alliance May Break

जम्मू-काश्‍मीरातील सत्तारूढ काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स आघाडी तुटण्याच्या मार्गावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जम्मू-काश्मिरातील सत्तारूढ काँग्रेस व नॅशनल काँग्रेस यांच्यात मतभेद वाढल्याने सरकार कोसळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात. 700 प्रशासकीय समित्यांच्या स्थापनेवरून उभय पक्षांत वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीआधी या समित्या स्थापण्याच्या ओमर यांच्या इच्छेला काँग्रेसने विरोध केला आहे. समित्यांमुळे निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सलाच अधिक फायदा होईल, अशी भीती काँग्रेसला आहे.
मात्र ओमर योजनेच्या आर्थिक पैलूंकडे लक्ष देत नसल्याचे कारण काँग्रेसने पुढे केलेले आहे. सोमवारी काँग्रेसच्या राज्य प्रभारी अंबिका सोनी, प्रदेशाध्यक्ष सैफुद्दीन सोज व केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची ओमर अब्दुल्लांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरली. नॅशनल कॉन्फरन्सच्या सूत्रांनुसार, ओमर यांनी पद त्यागण्याची तयारी केली आहे.