आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Ncp Allience In Maharashtra, Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बिघाडी\'च्या मार्गावर? : काँग्रेसच्या बैठकीत सर्व जागांबाबत चर्चा, राष्ट्रवादीने दिला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने ही आघाडी तुटणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवी दिल्लीमध्ये सध्या काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीत सर्व जागांबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. तर काही वेळातच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आहे. काँग्रेसने आजच्या आज याबाबत अंतिम निर्णय घ्यावा असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
नवी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये अंतिम निर्णयाची शक्यता होती. मात्र अद्याप तशी माहिती मिळालेली नाही. दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर ठाम असल्याने काँग्रेसने टोकाची भूमिका घेऊन आघाडी तोडण्याचा निर्णय केल्यास आज काँग्रेसतर्फे उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतिम निर्णय होऊ शकतो. काँग्रेसकडून कोणताही नवा प्रस्ताव मिळालेला नसून आपण अर्ध्या म्हणजेच 144 जागांच्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेही अंतिम तयारीत असल्याचे दिसते आहे.