आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कुठे गेला भाजपचा धर्म? मुस्लिम धर्मगुरू भेटींवर काँग्रेसची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुस्लिम धर्मगुरूंना भेटण्याच्या प्रकारामुळे प्रारंभी भाजपने कॉँग्रेसला लक्ष्य केले होते. मात्र, आता भाजपही त्याच मार्गावर गेला असल्याने काँग्रेसने आता कुठे गेला भाजपचा धर्म, अशी विचारणा करत पक्षावर जोरदार टीका केली आहे. भाजपचा खरा धर्म हाच असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुस्लिम धर्मगुरू शाही इमाम बुखारी यांच्याशी भेट झाल्यानंतर भाजपने यावर टीकास्त्र सोडले होते. कॉँग्रेस धर्मवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप भाजपने त्या वेळी केला होता. मात्र, सोमवारी रात्री लखनऊ येथे भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी प्रतिष्ठित मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली. या भेटीचा कॉँग्रेसने मंगळवारी खरपूस समाचार घेतला. कॉँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अजय माकन यांनी भाजपवर टीका करताना राजनाथसिंह यांनी आता मुस्लिम धर्मगुरूंना भेटण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. ते एकटेच भेटीला जात नाहीत तर सोबत मीडियालाही घेऊन जातात आणि मग दिवसभर वाहिन्यांवरून त्या बातम्या दाखवल्या जातात. आता भाजपचा धर्म कुठे गेला आहे? हा धर्मवाद नाही काय? असा प्रo्नही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसने असा प्रकार मात्र कधीच केला नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

राजनाथसिंह यांनी सोमवारी रात्री ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया उलेमा मौलाना कल्बे सादिक यांची भेट घेतली तेव्हा मौलाना कल्बे जव्वाद, मौलाना हमिदुल हसन, मौलाना यासूब अब्बास, ईदगाहचे इमाम खालिद रशीद उपस्थित होते.