आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress News In Marathi, Aurangabad, Sonia Gandhi, Divya Marathi

निवडणुकीचा आखाडा: काँग्रेसची पहिली यादी जाहीर औरंगाबादबाबत गुंता कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, आयटी तज्ज्ञ नंदन निलेकणी आणि क्रिकेटपटू मोहंमद कैफ याच्यासह 194 उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी काँग्रेसने शनिवारी रात्री जाहीर केली. पक्षाने पहिल्यावहिल्या यादीत अनेक नवीन व तरुण चेह-यांना संधी दिल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना येथील उमेदवार ठरवण्याबाबत काँग्रेसचा घोळ अद्याप कायमच असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.


पहिल्या यादीतील सुमारे 35 टक्के उमेदवार पन्नाशीच्या आतील आहेत. सोनिया रायबरेलीतून, तर राहुल अमेठी या परंपरागत मतदारसंघातून लढतील. ‘आधार’चे प्रमुख निलेकणी यांना दक्षिण बंगळुरूतून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाची करुण शुक्ला यांना छत्तीसगडच्या बिलासपूरमधून तर मोहंमद कैफला उत्तर प्रदेशातील फुलपूरमध्ये उमेदवारी दिली आहे.


बारा विद्यमान खासदारांना तिकीट
1) सुशीलकुमार शिंदे-सोलापूर
2) माणिकराव गावित - नंदुरबार 3) मुकुल वासनिक - रामटेक 4) प्रिया दत्त - उत्तर-मध्य मुंबई 5) संजय निरुपम - उ. मुंबई 6) मिलिंद देवरा - द. मुंबई 7) गुरुदास कामत - वायव्य मुंबई 8) एकनाथ गायकवाड - दक्षिण-मध्य मुंबई 9) विलास मुत्तेमवार - नागपूर 10) भाऊसाहेब वाकचौरे - शिर्डी 11) प्रतीक पाटील - सांगली 12) नीलेश राणे - सिंधुदुर्ग 13) अमरीश पटेल - धुळे (माजी खासदार)


हिंगोली, रायगड अदलाबदल
2009 मध्ये काँग्रेसने लढवलेली रायगडची जागा आता राष्‍ट्रवादी लढवणार असून राष्‍ट्रवादीच्या कोट्यातील हिंगोलीच्या लोकसभा जागेवर काँग्रेसचा उमेदवार असेल. राष्‍ट्रवादीच्या कोट्यातील हातकणंगले मतदारसंघात यंदा काँग्रेस आपला उमेदवार उभा करेल.