आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशभर काँग्रेसमध्ये बंडाळीला उधाण! महाराष्ट्रानंतर हरियाणा, आसाममध्ये नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षात आता देशभर बंडाळी पसरत चालली आहे. महाराष्ट्रात नाराज उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी राजीनामा दिला, तर हरियाणा, आसाम आणि जम्मू-काश्मीरमधील नेत्यांनीही पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत बंडखोरीचे शस्त्र उगारले आहे.

हरियाणा : मुख्यमंत्री भूपिंद्रसिंग हु़ड्डा यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणुकीनंतर बंडाळी सुरू आहे. हुड्डा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नुकतीच भेट घेतली. राज्यातील दुसरे ज्येष्ठ नेते चौधरी बीरेंद्र सिंह यांनी हुड्डा यांचे नेतृत्व नाकारले.

आसाम : आसामात काँग्रेसच्या 78 पैकी 30 आमदारांनी शिक्षणमंत्री हिंमता बिस्वा यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.

जम्मू-काश्मीर : काँग्रेसचे माजी खासदार लाल सिंह यांनी पक्षत्याग केला आहे. सत्तारूढ नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसची युती तुटल्यावर काही तासांतच लाल सिंह यांनी हा निर्णय जाहीर केला.