आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने माझ्या कामाची स्तुती केली नाही - थरूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस खासदार शशी थरूर आपल्याच पक्षााला वैतागले आहेत. ब्रिटनमध्ये दिलेल्या भाषणाबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची स्तुती केली. मात्र, स्वत:च्या पक्षाकडून प्रशंसा तर लांबच, उलट फटकारच मिळाली.इतकेच नव्हे तर त्यांच्यावर पक्षाच्या बैठकांच्या बातम्या फोडण्याचा आराेप लागला. यामुळे थरूर यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांना सडेतोड पत्र लिहिले आहे.

काँग्रेसने मी केलेल्या कामांची कधीच प्रशंसा केली नसल्याचे त्यात म्हटले आहे. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात काँग्रेसने गदारोळ करावा, अशी थरूर यांची इच्छा नव्हती. नेमके हेच त्यांचे विधान माध्यमांनी उचलून धरले. त्यावरून नाराज सोनियांनी थरूर यांना फटकारत ‘तुम्ही नेहमी असेच करता’ असेही सुनावले होते. यावरून आता थरूर यांनी सोनियांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, थरूर यांनी यापूर्वी मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेचे तोंडभरून कौतूक केले होते. त्याचबरोबर ते मोदी यांच्या काम करण्याच्या शैलीचे देखील प्रशंसक राहिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...