आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या भाषणात बलुचिस्तानच्या उल्लेखावरुन काँग्रेसचा विरोध, BJP ने करुन दिली ही आठवण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी लालकिल्ल्यावरुन दिलेल्या भाषणात बलुचिस्तान आणि POK चा उल्लेख केला होता. काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी याचा विरोध केला. ते म्हणाले, 'हा मुद्दा उपस्थित करुन सरकारने पाकव्याप्त काश्मीरसंदर्भातील भारताच्या लढाईला खिळ घातली आहे.' त्याला उत्तर देताना भाजपने काँग्रेसला 2009 मधील शर्म-अल-शेखची आठवण करुन दिली.

तेव्हा भारताचे तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि पाकचे तत्कालिन पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेत बलुचिस्तानमध्ये भारताची वाढती दखल याचा उल्लेख झाला होता. ही भारताची डिप्लोमॅटिक चूक असल्याचे मानले गेले होते.
- भारताच्या 70व्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी दिलेल्या भाषणाच्या काही तासांनंतर माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले, 'बलुचिस्तानबद्दल पंतप्रधानांनी सार्वजनिक स्टेटमेंट करायला नको होते.'

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार खुर्शिद म्हणाले,'बलुचिस्तान भारताचा भाग होता. मात्र पंचशील तत्वातील सिद्धांतानुसार, दुसऱ्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याची भारताला परवानगी नाही.'
- खुर्शिद म्हणाले, 'बलुचिस्तानचा सार्वजनिक उल्लेख करुन सरकारने पीओकेची समस्या सोडवण्याऐवजी जटली करण्याचे काम केले आहे. याआधी भारताने असे कधीही केलेले नाही. हा प्रश्न बंद दरवाजाआडच्या चर्चेत उपस्थित झाला पाहिजे होता. मात्र सरकारने पाकिस्तानला भारताला टार्गेट करण्याची आणखी एक संधी दिली आहे.'
- खुर्शिद यांनी शर्म-एल-शेखमध्ये झालेल्या वादाचा संदर्भ देऊन सांगितले की भाजपने तेव्हा विचारले होते की पाकिस्तानच्या मंजूरीची गरज काय, आणि आता पंतप्रधान म्हणत आहेत की बलुचिस्तानच्या जनतेसोबत आहोत. हे योग्य आहे का ?
बातम्या आणखी आहेत...