आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Only Give Assurance, But Not Work Doctor Allegation

काँग्रेस आश्वासने देते, काम करत नाही - डॉक्टरचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्‍ट्रीय वक्फ विकास महामंडळाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे भाषण सुरू असतानाच फहीम बेग नावाच्या एका व्यक्तीने हातातील कागद फडकावत घोषणाबाजी केली. जुन्या योजनांचीच अजून अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे नव्यांची घोषणा करू नये, असे त्याचे म्हणणे होते. पंतप्रधानांचे भाषण संपत आले असतानाच बेग यांनी जागेवर उभे राहून गोंधळ सुरू केला. पंतप्रधानांना 150 हून अधिक निवेदने दिली. पण उत्तर मिळाले नाही. काँग्रेस आश्वासने देते, काम करत नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
फहीम बेग डॉक्टर
गदारोळ घालणारे फहीम बेग ईशान्य दिल्लीतील जफराबादेत डॉक्टर असून ते सामाजिक कार्यकर्तेही आहेत. सरकारशी संपर्काचा मी अनेकदा प्रयत्न केला, परंतु याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे.