आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Opposition Post In Parliament, News In Marathi

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस हक्क सांगू शकत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देता येत नाही. या पदावर त्याचा हक्कही पोहोचत नाही, असा सल्ला महाअधिवक्ता मुकुल रोहतागी यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना दिल्यामुळे हा वाद पुन्हा जोर पकडण्याची शक्यता आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासूनच 10 टक्क्यांपेक्षा कमी जागा असलेल्या पक्षाला हे पद देण्याची परंपरा नाही, असे रोहतागी यांनी दिलेल्या सल्ल्यात म्हटले आहे. यासंदर्भात लोकसभाध्यक्षांच्या कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रोहतागी यांनी पत्र लिहून महाजन यांना हा सल्ला दिला आहे. काँग्रेसकडे लोकसभेत 44 जागा आहेत. 543 सदस्यांच्या संख्येच्या तुलनेत त्या 10 टक्केही नाहीत. रोहतागी यांनी पत्रात लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळकर यांच्या काळातील उदाहरण दिले आहे. राजीव गांधी सरकारच्या काळातही काँग्रेसला 400 जागा मिळाल्या होत्या आणि दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष टीडीपीला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले नव्हते. या मुद्यावर काँग्रेसने या पदाशिवायच समाधान मानून घेतले पाहिजे, असे भाजपचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी म्हटले आहे. महाअधिवक्त्यांच्या या सल्ल्याने लोकसभा अध्यक्ष भ्रमित होणार नाहीत, अशी अपेक्षा काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी म्हटले आहे.