आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Party Criticizing Ordinance Route Is A Like A Devil Quoting Scriptures

राहुल गांधीच्या लोकसभेतील भाषणाला भाजपने म्हटले, \'शैतान का प्रवचन\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भू-संपादन अध्यादेश आणि अवकाळी पाऊस, गारपिटग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन लोकसभेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर सरकारने पलटवार केला आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी राहुल गांधींच्या भाषणाला 'शैतान का प्रवचन' म्हटले आहे. मंगळवारी भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर नायडूंनी भू-संपादन संशोधन विधेयकावरुन सरकार मागे हटणार नसल्याचे सांगितले. राहुल गांधींचे नाव न घेता नायडूंनी त्यांच्या भाषणाला 'शैतान का प्रवचन' संबोधले. मात्र लगेच त्यांनी ती एक म्हण असल्याचेही स्पष्ट केले. नायडू म्हणाले,'त्यांना कळाले पाहिजे एक खोटे दहा वेळा सांगितले म्हणून ते खरे होत नाही.'
'सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को'
भू-संपादन अध्यादेशावरुन केंद्र सरकारवर होत असलेल्या टीकेला नायडूंनी मंगळवारी उत्तर दिले. ते म्हणाले, 'काँग्रेसचा कारभार सध्या सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को, असा आहे. सर्वाधिक अध्यादेश काँग्रेस सरकारच्याच काळात आणले गेले आहेत. पन्नास वर्षात काँग्रेस सरकारने 456 अध्यादेश आणले आहेत. 77 अध्यादेश नेहरु आणि 77 अध्यादेश इंदिरा गांधींनी जारी केले होते. त्यामुळे लोकसभेत बोलण्याआधी राहुल गांधी यांनी होमवर्क केला पाहिजे.'
काँग्रेसने नायडू यांचे वक्तव्य नैराश्यातून आल्याचे म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते अखिलेश सिंह म्हणाले,'भाजप राहुल गांधींना घाबरत आहे. त्यामुळेच सरकार त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला सहन करु शकत नाही आणि सकारात्मक घेऊ शकत नाही. या नैराश्यातूनच त्यांच्या मंत्र्यांचा स्वतःवरील ताबा सुटला आहे.'
काय म्हणाले होते राहुल गांधी, वाचा पुढील स्लाइडवर