आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यसभेत खडाखडी : सपा नेत्याची अपमानास्पद टिप्पणी, अय्यर गेले धावून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मिरमध्ये एलओसीवर भारतीय जवानांवर गोळीबार करण्यात आला आहे. यावर राज्यसभेत चर्चा करण्यावरून आज (मंगळवार) काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या सदस्य एकमेकांवर धावून गेले. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी तहकूब करण्यात आले आहे.

सपाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सीमेवर केलेल्या हल्यावर राज्यसभेत चर्चेची मागणी केली. यावर माजी पेट्रोलियम मंत्री मणीशंकर अय्यर यांनी, इतरही अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणे बाकी असल्याचे त्यांना सांगितले. ते म्हणाले, समाजवादी पक्षाच्या खासदारांना गॅसच्या वाढत्या किंमतीची चिंता नाही का ? यावर अग्रवाल यांनी अय्यर यांच्यावर अपमानजनक टीप्पणी केली. राज्यसभेचे अध्यक्ष हमिद अन्सारी यांनी अग्रवाल यांचे वक्तव्य तत्काळ रेकॉर्डवरून काढून टाकले.