आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress President Sonia Gandhi Comment On BJP In Delhi

भाजपवर घणाघाती टीका, धर्मनिरपेक्षतेशिवाय भारत अशक्य- सोनिया गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरूंच्या परंपरेची खरी उत्तराधिकारी केवळ काँग्रेसच असल्याचा पुनरुच्चार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. त्यांनी नेहरू जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपला थेट लक्ष्य केले.
नेहरूंच्या जीवन व कार्याला चुकीच्या पद्धतीने व अपूर्ण संदर्भाने सादर केले जात आहे. त्यांच्या भूमिकाही चुकीच्या पद्धतीने मांडण्यात येत असल्याची टीका सोनिया गांधींनी या वेळी बोलताना केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसने आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. धर्मनिरपेक्षतेशिवाय भारतीयत्वाची व भारताची संकल्पना पूर्णच होत नाही. वैविध्य असलेल्या या देशाच्या उभारणीसाठी ही पूर्वअटच आहे. नेहरूंनी धर्मनिरपेक्ष भारतासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले, असे या वेळी सोनिया म्हणाल्या. निवडणुकीतील यश-अपयश विनम्रतेने स्वीकारले पाहिजे. यशाने हुरळून जाऊ नये व अपयशाने निराशही होता कामा नये असे नेहरू सांगत, असे सोनिया यांनी सांगितले.