आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र काँग्रेसच्यावतीने अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मंगळवारी दुपारी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.

ऑगस्टमध्ये रोड शो दरम्यान बिघडली होती प्रकृती

- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोनिया गांधी यांनी ३ ऑगस्ट रोजी वाराणसीमध्ये साडेसहा किलोमीटर पदयात्रा केली होती.
- यावेळी सोनियांची प्रकृती बिघडल्यामुळे कार्यक्रम अर्ध्यातच थांबवण्यात आला होता. यावेळी त्यांना सुरुवातीला हॉटेलवर आणि नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते.
- काँग्रेस आमदार अजय राय यांनी सांगितले होते, की काँग्रेस अध्यक्षांना लो ब्लड प्रेशर आणि हाय फिव्हरची तक्रार होती. डॉक्टरांनी त्यांना तत्काळ दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला होता.
बातम्या आणखी आहेत...