आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress President Sonia Gandhi To Address A Rally In Badarpur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका पक्षात \'प्रचारक\' तर दुसर्‍यात \'धरणेबाज\'; सोनिया गांधींचे भाजपसह \'आप\'वर शरसंधान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतील निवडणुकीच्या रणधुमाळीत आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उतरल्या आहेत. सोनिया गांधी यांनी आज (रविवारी) दिल्लीतील बदरपूर भागात एका प्रचार सभेत संबोधित केले. सोनियांनी यावेळी भाजपसह 'आप'वर शरसंधान साधले. एका पक्षात 'प्रचारक' आहेत तर दुसर्‍या पक्षात 'धरणेबाज' आहेत, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.
गेल्या निवडणुकीत दिल्लीतील जनतेसाठी चांगले सरकार मिळेल या उद्देशाने 'आप'ला पाठिंबा दिला. परंतु, केजरीवाल यांना दीड महिना देखील व्यवस्थित सरकार चालवता आले नसल्याचा टोला सोन‍िया गांधी यांनी लगावला. भाजपने देखील या काळा दिल्लीतील जनतेला वार्‍यावर सोडले होते. त्यामुळे दिल्लीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
महिलांवरील अत्याचारात वाढ झाली. तसेच महागाईसह भ्रष्टाचार फोफावला. लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. या प्रकाराला कोण जबाबदार आहे? असा सवाल सोनिया गांधी यावेळी उपस्थित केला आहे.