आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Puts Question Mark On Smriti Irani\'s Less Qualification

भाजपचे प्रत्युत्तर, सोनियांचे शिक्षण किती ते सांगा? इंदिरा, राजीव गांधीही पदवीधर नव्हते?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती जुबिन ईरानी यांच्या शिक्षणाच्या मुद्याचा बहाणा करत काँग्रेसने भाजपवर पहिला हल्ला चढवला. मात्र हा हल्लाही काँग्रेसच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांग्रेसचे मीडिया सेलचे इंचार्ज अजय माकन यांनी ट्वीटरवरुन भाजपवर टीका केली होती. 'मोदींच्या मंत्रिमंडळातील एचआरडी विभागाच्या मंत्री साध्या पदवीधरही नाहीत, असे माकन म्हणाले होते. पण त्यानंतर या मुद्यावरून वाद सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या या हल्ल्याला भाजपनेही प्रत्युत्तर दिले.

मंत्र्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणा-यांना हे माहिती आहे, का की या देशात दोन पंतप्रधान असेही होऊन गेले आहेत, जे केवळ 12 वी पास होते. योगायोग म्हणजे हे दोन्ही पंतप्रधान (इंदिरा आणि राजीव गांधी) स्मृती यांच्यावर आरोप करणा-यांच्याच पक्षातील होते, असे भाजपने म्हटले आहे. तसेच युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांची शैक्षणिक पात्रता उघड करा असेही भाजपतर्फे उमा भारतींनी म्हटले आहे.
सोनियांचे नाव घेताच काँग्रेसच्या तलावारी म्यान
उमा भारती यांनी काँग्रेसला सोनियांच्या शिक्षणाबाबत सवाल केला. त्यावर सोनियांचे नाव समोर येताच काँग्रेसने तलवारी म्यान केल्या आहेत. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी आपल्याच नेत्यांना कोणावरीही टीका करताना काळजी घेण्याची समज दिली आहे.
इंदिरा आणि राजीव गांधींच्या शिक्षणाबाबत वाचा पुढील स्लाईड्सवर