आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यात काँग्रेसने का कच खाल्ली ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत त्या म्हणाल्या, 'आपल्या पक्षात पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची परंपरा नाही.' नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर चार राज्यात काँग्रेस पराभूत झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सोनिया गांधींनी, काँग्रेस योग्यवेळी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करेल असे म्हटले होते. त्यानंतर 3 जानेवारी रोजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी यापुढे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगत राहुल गांधींचा मार्ग मोकळा केला होता. मात्र, गुरुवारी झालेल्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत काँग्रेसने वेगळाच निर्णय घेतला आहे.
राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यास काँग्रेसने नकार दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसला चिमटा घेतला आहे. ते म्हणाले, 'अपयशाचे खापर फुटू नये म्हणून कॉँग्रेस राहुलना पीएम उमेदवार घोषित करण्याचे टाळत आहे. त्यांना माहित आहे, 2014 मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणूकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे.' राजकीय विश्लेषकांनी काँग्रेसच्या निर्णयाला त्यांनी 'जूनी परंपरा' सांगून सेफ गेम खेळत असल्याचे म्हटले आहे. नेमके काय कारण आहे काँग्रेसने राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले नसल्याचे? जाणून घ्या पाच कारणे, ज्यामुळे काँग्रेसने राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले नाही.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, काँग्रेसने राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित न करण्याची पाच कारणे.