अमेठी- ए
किकडे देशातील जनता वीज संकटाला तोंड देत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान
नरेंद्र मोदी जपानमध्ये जाऊन ड्रम वाजवत आहेत, या शब्दांत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.
अमेठी या त्यांच्या मतदारसंघात बोलताना राहुल गांधी म्हणाले, की सध्याच्या केंद्र सरकारला सत्तेत येऊन तब्बल 100 दिवस झाले आहेत. तरीही जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी महागाई आणि भ्रष्टाचारावर अंकूश लावण्याची भाषा केली होती. परंतु, आता सरकारला
आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या कॉंग्रेसच्या पराभवावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, की अशा घटना घडत असतात. आम्ही त्यावर मात करुन दाखवू.
पाच दिवसांचा जपान दौरा आटोपून नरेंद्र मोदी काल भारतात परतले. येत्या पाच वर्षांत जपानने भारतात 35 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. मोदींच्या दौऱ्यानंतर द्विपक्षीय संबंधांना बळकटी मिळाली आहे. या पार्श्वभूमिवर राहुल गांधी यांच्या आरोपांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, राहुल गांधी यांच्या अमेठी दौऱ्याची छायाचित्रे....