आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Releases Poll Manifesto News In Marathi

आर्थिक आरक्षण, घराची हमी; तिसर्‍या खेपेच्या आशेवर काँग्रेसची खेळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कॉँग्रेसने 2009 मधील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दिलेल्या वचनांमधील 90 टक्के आश्वासनांची पूर्तता झाल्याची ग्वाही कॉँग्रेसने बुधवारी दिली. 100 दिवसांत महागाई कमी करू आणि भ्रष्टाचाराचा नायनाट करू! या दोन्ही गोष्टी 2009च्या वचननाम्यानुसार करू शकले नाहीत त्यामुळे हे मुद्दे या वेळच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. शिवाय 10 कोटी तरुणांना रोजगाराचे आमिष दाखवून कॉँग्रेसने पुन्हा सत्तेत येऊ द्या; अशी विनंती जनतेला जाहिरनाम्याच्या माध्यमातून केली आहे.

कॉँग्रेस मुख्यालयात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते 2014-2019 या काळासाठीच्या जाहीरनाम्याचे विमोचन करण्यात आले. या वेळी डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष ए. के. अँन्टोनी, जनार्दन द्विवेदी आणि अजय माकन उपस्थित होते.

आर्थिक विकासाचा दर 2008 मध्ये आर्थिक संकटाचा सामना करण्यापूर्वी 9 टक्के होता. चालू आर्थिक वर्षात तो 4.9 टक्के राहण्याची शक्यता आहे. तीन वर्षांत तो 8 टक्क्यांवर अधिक नेण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी काँग्रेसची घोषणा आहे. राहुल यांनी पाच महिन्यात देशात 27 ठिकाणी भेटी दिल्यात, 10 हजार लोकांच्या वेदना जाणून घेतल्या. त्यांचाच समावेश जाहिरनाम्यात केल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील मासेमारांची समस्या, रेल्वे स्थानकावरील कुली, रिक्षाचालक, अंगणवाडी कर्मचारी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे समूह, कामगार, उद्योजक, ग्रामपंचायतीचे सदस्य, निवृत्त कर्मचारी, युवक, शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्यांक आदींच्या समुहाला राहुल गांधी भेटी देऊन, चर्चा करून, त्यांची मते घेऊन या सर्वांच्या विकासासाठी कॉँग्रेस त्यांच्यासाठी काय करणार आहेत याबाबत या घोषणापत्रात आश्वासन देण्यात आले आहे. याच कारणाने कॉँग्रेसचे हे घोषणापत्र वास्तविकतेला धरून आणि पहिल्यांदाच आगळेवेगळे असल्याचे मत सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. सिंग यांनी व्यक्त केले.

खासगी क्षेत्रात आरक्षणाचा प्रयत्न करू : काँग्रेस
तरुणांसाठी...
5 वर्षांत 10 हजार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगार.
2009 मध्ये दीड कोटी उद्दिष्ट. पण गाठता आले 50 लाख.

महिलांसाठी..
महिलांना एक लाखाचे कर्ज
आरक्षण बिल, सुरक्षा, सन्मान

ज्येष्ठांसाठी...
उपचार, औषधी व पेन्शनची हमी

आणि इतरांसाठी..
20 वर्षांवर अधिक काळ भाड्याने राहिल्यास घराच्या मालकीचा अधिकार, आर्थिक दुर्बलांना आरक्षण, अनुसूचित जाती व जमातींना खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा प्रयत्न करू, प्रत्येकाचे बँक खाते. 8 टक्के विकासदर गाठू, 5 वर्षांत 80 कोटी गरिबांना मध्यमवर्गात आणणार.

ही आश्वासने नाहीत : अल्पसंख्याकांना रोजगारात आरक्षण देणे.
गेल्या वेळची आश्वासने पुन्हा : महिला आरक्षण, 10 कोटी नवे रोजगार, विद्यार्थी शिष्यवृत्ती, भ्रष्टाचारविरोधी बिल
सामाजिक आर्थिक बदलासाठी...औषधी, पेन्शन, घर, सामाजिक सुरक्षेचा अधिकार, खासगी आरक्षण, जातीय हिंसाचारविरोधी बिल.

आम आदमी गायब
2004 जाहीरनामा प्रसिद्ध करताना ‘काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ’चा नारा होता.
2009 मध्ये जाहीरनाम्यात घोषणा करण्यात आली... ‘आम आदमी के बढते कदम, हर कदम पर भारत बुलंद’
2014 च्या जाहीरनाम्याचा नारा.. ‘हर हाथ शक्ति, हर हाथ तरक्की’ आणि ‘आपकी आवाज, हमारा संकल्प’