आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Removes Shashi Tharoor From The Post Of Spokesman

मोदींची स्तुती महागात, काँग्रेसने शशी थरुर यांना प्रवक्ते पदावरुन हटविले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्यामुळे काँग्रेसने अखेर शशी थरुर यांचे प्रवक्तेपद काढून घेतले आहे. मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीत 'स्वच्छ भारत अभियान' सुरु केले, त्यावेळी त्यांनी थरुर यांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर थरुर यांनी मोदींचे कौतूक केले होते.
शशी थरुर हे यूपीएच्या काळात केंद्रीय राज्यमंत्री होते. पाच महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळेही काँग्रेस त्यांच्यावर नाराज असल्याचे कळते.

केरळ काँग्रेसने केली होती शिस्तभंगाची मागणी
शशी थरुर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 'स्वच्छ भारत अभियान'चे कौतुक केल्यानंतर केरळ प्रदेश काँग्रेसने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस हायकमांडकडे केली होती.
केरळ काँग्रेसचे प्रमुख व्ही.एम.सुधीरन म्हणाले होते की, थरूर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करायला हवा. थरूर यांची कार्यशैली पक्षाला स्वीकार्य नाही. प्रदेश कार्यकारिणीने या प्रकरणाचा अहवाल बुधवारी काँग्रेस मुख्यालयाला पाठवला होता. यासंबंधीचा निर्णय हायकमांडवर सोपविला होता.