आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Removes Shashi Tharoor From The Post Of Spokesman Divyamarathi News

मोदींच्या प्रशंसेची शिक्षा, प्रवक्तेपद गेले; थरुर म्हणाले - बाजू मांडण्याची संधी दिली नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्यामुळे काँग्रेसच्या शिस्तभंग समितीने माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी केली आहे. मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीत 'स्वच्छ भारत अभियान' सुरु केले, त्यावेळी त्यांनी थरुर यांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर थरुर यांनी मोदींची केलेली प्रशंसा त्यांना महागात पडली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीने केलेली शिफारस राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी स्विकारली. त्यानुसार तत्काळ प्रभावाने थरुर यांचा प्रवक्तेपदावरुन दूर करण्यात आले. यावर शशी थरुर मला माझी बाजू मांडण्याची संधीही दिली नाही असे म्हटले आहे.
दुसरीकडे काँग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा म्हणाल्या, शशी थरुर हे वारंवार मोदींची प्रशंसा करत होते. यामुळे केरळ प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुखावले गेले होते. कारण थरुर यांच्या विजयासाठी त्यांनी परिश्रम घेतले होते. ओझा यांनी हे देखील स्पष्ट केले की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाचा पक्षाच्या निर्णयाशी काहीही संबंध नाही. थरुर यांच्या हकालपट्टीवर सोशल मीडियावर आता चर्वीत चर्वण सुरु झाले आहे. जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी थरुर आणि काँग्रेसला चिमटा घेतला आहे.
थरुर यांच्या प्रकरणावर ट्विटवर अनेक कॉमेंट्स येत आहेत, उमर अब्दुल्ला काय म्हणाले ते पाहा.
@abdullah_0mar: World's Shortest Resignation Letter :
Dear Sonia Ji,
I admire Mr. Narendra Modi.
Thanks,
Shashi Tharoor."

("प्रिय सोनियाजी,
मी श्री. नरेंद्र मोदींचा प्रशंसक.
धन्यवाद,
शशी थरुर ")

प्रतिक्रिया
शशी थरुर यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर भाजप आणि काँग्रेस दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येत आहेत. भाजपने थरुर यांचा बचाव केला आहे. भाजप प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले, 'काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यापेक्षा हायकमांडच्या इच्छेनुसारच बोलले पाहिजे, अशी त्यांची इच्छा दिसत आहे. ' तर काँग्रेस नेते आणि प्रवक्ते गुलाम नबी आझाद म्हणाले, 'प्रवक्ते हे पक्षाची बाजू मांडत असतात. ना की स्वतःची.' दुसरीकडे केरळ प्रदेश काँग्रेसने थरुर यांच्या हकालपट्टीचे स्वागत केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, थरुर यांचे पत्र. यात त्यांनी पक्षाचा निर्णय स्विकारला आहे.